नवी दिल्ली, 21 डिसेंबर (हिं.स.) : लोकसभेचे कामकाज आज, गुरुवारी 21 डिसेंबर रोजी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची वेळ 22 डिसेंबरपर्यंत निश्चित करण्यात आली होती.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले की, सभागृहाचे कामकाज 61 तास 50 मिनिटे चालले. कामाची प्रॉडक्टिव्हिटी 74 टक्के होती. चर्चेनंतर 18 सरकारी विधेयके मंजूर करण्यात आली. शून्य तासात 182 प्रकरणे समोर आली. भारतीय न्याय संहिता, भारतीय न्याय सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा विधेयक या तीन गुन्हेगारी विधेयकांवर राज्यसभेत चर्चा सुरू आहे. यामध्ये ब्रिटीशकालीन देशद्रोहाचा कायदा रद्द करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि मॉब लिंचिंगसारख्या गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा दिली जाईल.
लोकसभेतून आज, गुरुवारी (21 डिसेंबर) आणखी 3 खासदारांना निलंबित करण्यात आले. यामध्ये काँग्रेस खासदार डीके सुरेश, नकुल नाथ आणि दीपक बैज यांचा समावेश आहे. हिवाळी अधिवेशन काळात संसदेच्या दोन्ही सभागृहातून आतापर्यंत एकूण 146 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार
