नाशिक, १६ ऑक्टोबर, (हिं.स.) : महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून आज सोमवारपासून प्रथम सत्रातील आकारिक व संकलित मूल्यमापन चाचणीचे नियोजन करण्यात आले असून या परीक्षा सोमवार दि. १६ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे.
इयत्ता तिसरी ते आठवीसाठी मनपा शाळा, शासकीय कन्या शाळा व खासगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी मराठी, गणित व इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिका उत्तरसूची व शिक्षक सुचनांसह शासन स्तरावरून येणार आहेत. इयत्ता पहिली ते दुसरी सर्व विषय, इयत्ता तिसरी ते आठवी मराठी, गणित व इंग्रजी विषय सोडून इतर सर्व विषयांच्या संकलित मुल्यमापनाच्यावर प्रश्नपत्रिका व आकारिकसाठी तोंडी प्रश्नपत्रिका स्वत: काढायच्या आहेत. त्या मुख्याध्यापकाकडून प्रमाणित करून घ्याव्यात. दि. १६ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत आकारिक मुल्यमापन (रविवार व दसरा सोडून), २५ ते ३१ ऑक्टोबरमध्ये संकलित मूल्यमापन (रविवार सोडून), १ ते ४ नोव्हेंबर सर्व शाळांमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात यावा असे महापालिकेचे शिक्षणाधिकारी बी.टी. पाटील यांनी कळविले आहे.
हिंदुस्थान समाचार
