नाशिक, २३ जानेवारी ( हिं.स.) : शतकातून एखाद्याच वेळी जन्मणाऱ्या सुरेल गायक स्वर्गीय गायक मोहम्मद रफी यांच्या गीतांची मैफल बुधवारी, २४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. यंदा मोहम्मद रफी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने वर्षभर प्रत्येक महिन्याच्या २४ तारखेला मैफल करण्याचे ठरविले आहे. या मालिकेतील पहिले पुष्प संयोजक घनश्याम पटेल व सूर श्रद्धा म्युझिकल फाउंडेशनतर्फे गुंफण्यात येईल.
सायंकाळी ५.३० वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृहात होणाऱ्या सौ बार जनम लेंगे या मैफलीत मुख्य गायक घनश्याम पटेल यांच्या बरोबरच संजय डेरे, खिमजी शाह, अजय पाटील, अमित गुरव रफींची गाजलेली गाणी सादर करतील. त्यांना स्मिता पांडे, ज्योती फाल्गुने स्वरसाथ तर दिनेश गोविल सूत्रसंचालन करणार आहेत. सर्व रसिक श्रोत्यांनी या विनामूल्य मैफलीला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार
