भूकंपाचे केंद्र किर्गिस्तान व चीन सीमेवर होते
नवी दिल्ली, 23 जानेवारी (हिं.स.) : राजधानी दिल्ली सोमवारी रात्री 11.39 वाजेच्या सुमारास भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली. हे धक्के बराच वेळ बसत होते. या भूकंपाचा केंद्रबिंदू हा किर्गिस्तान आणि चीन सीमेवर होता. तसेच रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.2 इतकी मोजली गेली आहे. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की लोक घाबरून घराबाहेर पडले. भारत आणि चीन व्यतिरिक्त किर्गिस्तान, नेपाळ आणि पाकिस्तानच्या काही सीमावर्ती भागातही हे धक्के बसले.
मिळालेल्या माहितीनुसार, किर्गिस्तान आणि चीन सीमेवर असलेल्या शिनजियांग भागात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.2 इतकी मोजली गेली आहे. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की दिल्ली-एनसीआरमध्येही त्याचा प्रभाव जाणवला. बराच वेळ पृथ्वी थरथरत राहिली. भीतीपोटी लोक घराबाहेर पडून मोकळ्या जागेत आले. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरच्या माहितीनुसार, रात्री 11.39 वाजता भूकंपाचे धक्के जाणवलेत. भूकंप चीनच्या शिनजियांग प्रदेशात जमिनीच्या 10 किमी (6.21 मैल) जमिनीच्या आत आल्याचे जर्मनीच्या भूवैज्ञानिक संशोधन केंद्राने म्हटले आहे.
हिंदुस्थान समाचार
