अहमदनगर, 5 नोव्हेंबर(हिं.स.):- महानगरपालिकेच्या वतीने चौथी ते पाचवी व सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 7 व 8 नोव्हेंबर रोजी बुरूडगाव रोड साई उद्यान येथे दिवाळी निमित्त गड,किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन केले आहे.नगर शहरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.स्पर्धेतील विजेता विद्यार्थ्यांसाठी प्रथम पारितोषिक सायकल द्वितीय पारितोषिक,क्रिकेट किट व तृतीय पारितोषिक डिजिटल घड्याळ देण्यात येणार आहे,अशी माहिती उपमहापौर गणेश भोसले यांनी दिली.
उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की,अहमदनगर महानगरपालिका व माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत गड किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे.या माध्यमातून विद्या र्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जोपासण्याचे काम होणार आहे.विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची ओळख होईल.तसेच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना देखील वाव मिळणार आहे,असे ते म्हणाले.
हिंदुस्थान समाचार
