
डोंबिवली, 04 एप्रिल (हिं.स.)।
शिवाजीराव एस. जोंधळे अभियांत्रिकी महाविद्यालय, डोंबिवली (पूर्व) येथे Interdisciplinary Insights and Practices for Sustainable Growth (I³PSG 2026) या आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. ही परिषद IETE व IIChE यांच्या सहकार्याने पार पडली.
उद्घाटन प्रसंगी डॉ. मुनीर सय्यद (Reliance Jio), डॉ. जगदीश बाकल, डॉ. सुवर्णा भिसे (IETE) व नरेंद्र चौधरी (समर्थ समाज) उपस्थित होते. त्यांनी आंतरशाखीय संशोधन व शाश्वत विकासासाठी नवकल्पनांचे महत्त्व अधोरेखित केले.
या परिषदेत भारतातील आणि भारताबहेरील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतील ३०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले असून १०० पेक्षा अधिक निवडक संशोधन निबंध सादर करण्यात आले. प्राचार्या डॉ. उत्तरा गोगटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रज्ञा इंगळे व प्रा. प्राजक्ता खैरे यांनी समन्वयक म्हणून कार्य केले. सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी स्वयंसेवक यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
समारोप प्रसंगी समर्थ समाज संस्थेचे अध्यक्ष सागर जोंधळे, प्रवीण वायकोळे (National Peroxide Ltd.), तसेच धवल सक्सेना व प्रवीण सक्सेना (IIChE) उपस्थित होते. त्यांनी संशोधन कार्याचे कौतुक करून सहभागींना मार्गदर्शन केले.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi
