मुंबई, 15 डिसेंबर (हिं.स.) – मध्य रेल्वे ठाणे स्थानकाच्या ५.०० मीटर रुंद एफओबी (कल्याण टोकाला) साठी गर्डर्स लाँच करण्यासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक चालवणार आहे ज्यात अप जलद, ५वी, ६वी, अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर लाईन्स (स्पॅन-६) किमी ३२/.१४०T क्रेन वापरून २१-२२.
ब्लॉक तपशील : दि. १६/१७.१२.२०२३ (शनिवार/रविवार रात्रीची वेळ)
ब्लॉक कालावधी : २२.१० ते ०३.४०- ५व्या लाईनवर, ६व्या लाईनवर, अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर लाईन्सवर ०५.३० तास
अप जलद लाईनवर ००.१० ते ०२.४०- ०२.३० तास
वाहतूक ब्लॉक विभाग : अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर लाईन्स: ठाणे (प्लॅटफॉर्मसह) ते कोपर खैरणे (क्रॉसओव्हर वगळता)
६ वी लाइन: दिवा (क्रॉसओव्हर्स वगळता) ते मुलुंड (क्रॉसओव्हर्स वगळता)
५वी लाइन: मुलुंड (क्रॉसओव्हर्स वगळता) ते दिवा (क्रॉसओव्हर्स वगळता)
अप जलद लाइन: दिवा (क्रॉसओव्हर्स वगळता) ते मुलुंड (क्रॉसओव्हर्स वगळता)
ट्रेन धावण्याच्या वेळा :
अप मेल/एक्स्प्रेस गाड्यांचा मार्ग बदल : अप ६व्या मार्गावर धावणाऱ्या खालील मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण/दिवा येथून अप जलद लाईनवर वळवल्या जातील आणि त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
११०७२ कामायनी एक्स्प्रेस, १११०० मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, १२०५२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी, ११०८२ गोरखपूर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, २२१२० छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्स्प्रेस, २२५३७ कुशीनगर एक्स्प्रेस, ११०६२ जयनगर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, ११०२० कोणार्क एक्सप्रेस, १८०३० शालीमार लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, १८५१९ विशाखापट्टणम लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, १२१३४ मंगळूरु जंक्शन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस
डाऊन मेल/ एक्स्प्रेस गाड्यांचा मार्ग बदल : डाऊन ५व्या मार्गावर धावणाऱ्या खालील मेल/एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार येथून डाऊन जलद लाईनवर वळवल्या जातील आणि वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
१८०२९ लोकमान्य टिळक टर्मिनस शालीमार एक्सप्रेस, ११०१३ लोकमान्य टिळक टर्मिनस कोईम्बतूर एक्सप्रेस, १२१६७ लोकमान्य टिळक टर्मिनस बनारस एक्स्प्रेस, १२२१९ सिकंदराबाद दुरांतो, १२१४१ पाटलीपुत्र एक्स्प्रेस, १२८११ हटिया एक्सप्रेस, २२५३८ कुशीनगर एक्स्प्रेस, ११०९९ लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव एक्स्प्रेस
पनवेलच्या दिशेने डाऊन जलद लाईनवर धावणाऱ्या खालील मेल/एक्स्प्रेस गाड्या दादर आणि दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद लाईनवर धावतील आणि वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
१२१३३ मंगळुरु एक्स्प्रेस, २०१११ कोकण कन्या एक्स्प्रेस, ११००३ तुतारी एक्सप्रेस
ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे काम : ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्या अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर लाईन्सवर रद्द राहतील.
डाउन ट्रान्स हार्बर मार्गावरील ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल ठाणे येथून २१.५२ वाजता सुटेल आणि पनवेल येथे २२.४६ वाजता पोहोचेल.
अप ट्रान्सहार्बर लाईनवरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल वाशी येथून २१.२४ वाजता सुटेल आणि ठाणे येथे २१.५३ वाजता पोहोचेल.
अप ट्रान्सहार्बर लाईनवरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून २०.५१ वाजता सुटेल आणि ठाणे येथे २१.४६ वाजता पोहोचेल.
ब्लॉक कालावधीनंतरच्या पहिल्या लोकल वेळापत्रकानुसार धावतील.
प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे.
हिंदुस्थान समाचार
