पुणे 24 जानेवारी (हिं.स) पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण मतदारांच्या संख्येच्या प्रमाणानुसार चिंचवड विधानसभा मतदारसंघ सर्वात मोठा तर, कॅंटोन्मेंट मतदारसंघ सर्वांत लहान विधानसभा मतदारसंघ ठरला आहे. चिंचवडमधील एकूण मतदारांची संख्या आता ५ लाख ९५ हजार ४०८ इतकी झाली आहे.
कॅँटोन्मेंटमधील एकूण मतदारांची संख्या ही २ लाख ६९ हजार ५८८ इतकी आहे.जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील मतदारांची अंतिम यादी जाहीर केली आहे. या यादीत विधानसभानिहाय एकूण मतदारांची संख्या देण्यात आली आहे. या यादीतील मतदारांच्या आकडेवारीवरून चिंचवड हा जिल्ह्यात सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील २१ पैकी १४ विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदारांच्या संख्येत वाढ झाली असून, उर्वरित सात विधानसभा मतदार संघातील मतदारांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे.
हिंदुस्थान समाचार
