नवी दिल्ली, 24 जानेवारी (हिं.स.) – 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या (25 जानेवारी) देशाला संबोधित करणार आहेत.
हा संदेश आकाशवाणीच्या राष्ट्रीय वाहिनीवर संध्याकाळी सात वाजल्यापासून प्रसारित केला जाईल आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर हिंदी आणि त्यानंतर इंग्रजीत प्रसारित केला जाईल. दूरदर्शनवर हिंदी आणि इंग्रजीमध्ये संदेशाचे प्रसारण झाल्यानंतर दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्यांद्वारे प्रादेशिक भाषांमध्ये त्याचे प्रसारण केले जाईल. आकाशवाणीवर, 9.30 वाजल्यापासून त्यांच्या संबंधित प्रादेशिक नेटवर्कवर प्रादेशिक भाषेतील अनुवाद प्रसारित केले जातील.
हिंदुस्थान समाचार
