छत्रपती संभाजीनगर, 3 ऑगस्ट (हिं.स.)। पिकविमा भरण्याची मुदत वाढवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे शिवसेना खासदार संदिपान भुमरे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे केली आहे.
पीकविमा भरण्याची अंतिम तारीख संपल्यामुळे महाराष्ट्रातील आणि विशेषतः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधव पिकविमा भरू न शकल्यामुळे चिंतेत आहेत. नैसर्गिक आपत्ती, तांत्रिक अडचणी व अन्य कारणांमुळे अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास असमर्थ राहिले.
शेतकऱ्यांचे हे नुकसान टाळता यावे, त्यांना पुन्हा एक संधी मिळावी आणि त्यांच्या पिकांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने केंद्रीय कृषी मंत्री श्री. शिवराज सिंह चौहान यांना निवेदन दिले. पिकविमा भरण्याची मुदत वाढवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
या मागणीचा सकारात्मक विचार करून शेतकऱ्यांच्या हितासाठी लवकरच योग्य तो निर्णय घेण्याचा विश्वास मंत्री महोदयांनी दिला.
—————
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis
