नाशिक, १४ ऑक्टोबर – ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र स्टेट ब्रांच मुंबई व मराठा विद्या प्रसारक समाज परिचर्या शिक्षण संस्था आडगाव नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सोहळा गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा हॉल येथे पार पडला. परिषद उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिकूलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहाय्यक संचालिका डॉ. नीलिमा सोनवणे, महाराष्ट्र परिचार्य परिषदेच्या प्रबंधक अर्चना बडे, पुणे अटट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र स्टेट ब्रांच सेक्रेटरी श्रीमती प्राची धारप व महाराष्ट्र स्टेट ब्रांचचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
परिषदेच्या सुरुवातीला परिषदेच्या अध्यक्षा डॉ पौर्णिमा नाईक यांनी परिषदेच्या घोषवाक्याचे अनावरण केले सशक्त नर्सिंग विद्यार्थी व आव्हाने नर्सिंग विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हाने कशाप्रकारे सांभाळायची व आरोग्य सेवा कशी द्यायची याबद्दल मार्गदर्शन केले. परिषदेच्या स्मरणिकेचे अनावरण मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे , डॉ मिलिंद निकम व परिषदेच्या अध्यक्ष डॉ पौर्णिमा नाईक यांच्या हस्ते झाले.
परिषदेची सुरुवात विविध क्रीडा स्पर्धांनी झाली. क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन परिषदेच्या अध्यक्ष डॉ. पौर्णिमा नाईक यांच्या हस्ते झाले. दोन दिवशीय राज्यस्तरीय परिषदेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 894 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.संपूर्ण महाराष्ट्रातून 47 नर्सिंग महाविद्यालयांनी हिरीरीने त्यांच्या विद्यार्थी शिक्षक व स्टुडन्ट नर्सेस असोसिएशनचे मार्गदर्शकासह सहभाग नोंदवला. परिषदेत महाराष्ट्रातील नर्सिंग क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या परिचारिकांना व उत्कृष्ट नर्सिंग शिक्षकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. कामा हॉस्पिटल मुंबई येथे परिचारिका अंजली कुलथे यांनी 26 /11 च्या आतंकवादी हल्ल्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले तसेच पुष्पा श्रावण पोटे जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथील पाटयनिर्देशिका यांना नर्सिंग क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. पालघर येथील जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेविका सुजाता तूस्कानो यांना देखील परिचारिका क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर मिलिंद निकम यांनी परिचारिकाची वाढती मागणी व नर्सिंग क्षेत्रातील शिक्षणाची गुणवत्ता कशी उंचावता येईल यावर भर देण्याची गरज असल्याचे सांगितले. मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी अशा प्रकारच्या राज्यस्तरीय परिषदेतून नर्सिंग विद्यार्थ्यांना व शिक्षकांना त्यांचे भविष्यातील आव्हाने सशक्तपणे पेलण्यासाठी व देशाच्या तसेच राज्याचा आरोग्य सेवेचा कणा कणखर करण्यासाठी चालना मिळते असे प्रतिपादन केले.
