पुणे, 17 ऑक्टोबर, (हिं.स) महापालिकेच्या मिळकतकराच्या उत्पन्नवाढीसाठी तसेच नागरिकांच्या सोयीसाठी आता प्रत्येक शनिवारी महापालिकेची शहरातील नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवली जाणार असून सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत नागरिकांना कर भरता येणार आहे.
महापालिकेतही शासनाच्या धर्तीवर पाच दिवसांचा आठवडा असल्याने प्रत्येक शनिवार व रविवारी करभरणा केंद्र बंद ठेवली जातात. तर मे महिन्याच्या अखेरीस तसेच मार्च अखेरीस सुट्टीच्या दिवशी कर भरणा सुरू ठेवली जातात.मात्र, पहिल्यांदाच उत्पन्नवाढीसाठी आता शनिवारीही केंद्र सुरू राहणार आहेत. दरम्यान, कर संकलन विभागास 2023-24 या आर्थिक वर्षासाठी महापालिका आयुक्तांनी अंदाजपत्रकात तब्बल 2500 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट दिलेले असून आतापर्यंत या विभागास 1525 कोटींचा महसूल मिळाला आहे.
हिंदुस्थान समाचार
