अमरावती, 25 डिसेंबर (हिं.स.) :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज सोमवार 25 डिसेंबर रोजी अमरावतीत सकाळी ८ वाजता आगमन झाले . पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून स्वागत स्विकारल्यानंतर ते थेट शहरातील महफिल ईन हॉटेलक वर पोहचले
या ठिकाणी कार्यकर्त्यानी त्यांचे ढोल ताशे फटाके फोडून जलोषात स्वागत केले. जुना बायपास रस्त्यावरील हॉटेल प्राईम पार्क येथे असलेल्या प्रख्यात चित्रकार तसेच राज ठाकरे यांचे मित्र विजय राऊत यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहतील. विवाह सोहळ्यानंतर पक्षाच्या महत्त्वाच्या प्रमुख पदाधिकार्यांची ते बैठक घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुपारी अमरावती येथील बेलोरा विमानतळावरून ते मुंबईकडे रवाना होतील.
हिंदुस्थान समाचार
