cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > अंबरनाथमध्ये बोगस मतदानाचा आरोप; राजकीय आरोप-प्रत्यारोप
Regional

अंबरनाथमध्ये बोगस मतदानाचा आरोप; राजकीय आरोप-प्रत्यारोप

CliQ INDIA
Last updated: December 21, 2025 6:33 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

अंबरनाथ, 20 डिसेंबर (हिं.स.)। नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान कोहोजगाव परिसरात बोगस मतदानाच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मतदानाच्या दिवशी पहाटे एका सभागृहात शेकडो महिला आणि पुरुषांची गर्दी जमल्याचे निदर्शनास आल्यानंतर काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे सर्व मतदार बोगस असल्याचा आरोप केला. हे लोक भिवंडीहून अंबरनाथमध्ये मतदानासाठी आणले असल्याचा दावा करत कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आणि वातावरण तणावपूर्ण बनले.

राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण 143 सदस्यपदांसाठी मतदान होत असताना, अंबरनाथमधील या घटनेने राजकीय वातावरण तापवले. कोहोजगावमधील सभागृहात मोठ्या संख्येने जमलेल्या महिला व पुरुषांना पाहून काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. प्रतिस्पर्धी (शिवसेना शिंदे गट) उमेदवाराकडून बोगस मतदानासाठी या महिला आणल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सभागृहातील महिलांना बाहेर काढत चौकशी सुरू केली.

अंबरनाथ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 208 महिला आणि मुलं या ठिकाणी आढळून आली असून ते स्थानिक नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हे सर्वजण भिवंडीहून आल्याची माहिती असून, ते मतदानासाठीच आणले गेले होते का याची खात्री करण्यासाठी फिरते पथक तपास करत आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल लवकरच समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, बोगस मतदारांच्या आरोपांसोबतच पैसे वाटपाचाही आरोप समोर आला आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 28 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी दोन जणांना मतदारांना पैशांची पाकिटे वाटताना रंगेहाथ पकडल्याचा दावा केला आहे. या दोघांना भरारी पथकाच्या ताब्यात देण्यात आले असून पोलिस पुढील कारवाई करत आहेत. हे पैसे भाजपच्या उमेदवाराकडून वाटले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या सर्व घटनांमुळे अंबरनाथमधील निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

—————

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule

You Might Also Like

आयपीएस अंजना कृष्णा यांना समर्थन वाढू लागले
दादरमध्ये रंगणार दिवाळी संध्या – Hindusthan Samachar Marathi
शहापूरजवळ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या तीन बसचा अपघात, २५ जखमी
सर्व्हेअर कमी असल्याने पोलिस ठाण्यात वाढले वाद
उद्योगांना पाठबळ देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध – मुख्यमंत्री | Bullets-In

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article येस सिक्युरिटीजच्या वोंगाविटस सीझन 2 च्या मुंबईतील ग्रँड फिनालेमध्ये विजेत्यांचा गौरव
Next Article तोशाखाना प्रकरणात इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना १७ वर्षांची शिक्षा
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?