cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > उबाठा महाराष्ट्रातील सर्वात ‘ढ’ पक्ष – आ. रवी राणा
Regional

उबाठा महाराष्ट्रातील सर्वात ‘ढ’ पक्ष – आ. रवी राणा

CliQ INDIA
Last updated: December 23, 2025 6:38 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 22 डिसेंबर (हिं.स.) | सेना (उबाठा) आणि मनसेच्या संभाव्य युतीवर आमदार रवी राणा यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. राज्यातील उबाठाची अवस्था ही “घराबाहेरी वर्हांड्यातील बाकड्याप्रमाणे” झाली असल्याचा टोला लगावत, महाराष्ट्रातील सर्वात ढ पक्ष म्हणजे उबाठा असल्याचा आरोप त्यांनी केला.

उबाठा–मनसे युती ही केवळ मजबुरीतून होत असून, भाजपला रोखण्यासाठी हे पक्ष एकत्र येत असल्याचे रवी राणा म्हणाले. मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आज भाजपमध्येच असल्याचा दावाही त्यांनी केला. उबाठाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत आता मनसेसोबत युतीकडे वाटचाल सुरू केली असून, उद्धव ठाकरे सत्तेसाठी बेचैन झाल्याचा आरोप राणांनी केला. त्यांना महाराष्ट्राच्या हिताचे काही देणेघेणे नसल्याचेही त्यांनी म्हटले.

मुंबई महानगरपालिकेतून उद्धव ठाकरे यांना दररोज उत्पन्न मिळत असून, वसुलीचे काम महापालिकेच्या माध्यमातून सुरू राहावे यासाठीच ही सर्व राजकीय हालचाल सुरू असल्याची टीकाही आमदार रवी राणा यांनी केली.

बळवंत वानखडे यांना ब्रेक डान्सची गरज नव्हती; निवडून आलेले नगरसेवक रवी राणांचेच – आमदार रवी राणांचा खळबळजनक दावा

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि दर्यापूर नगरपरिषदांमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता येत नगराध्यक्ष विजयी झाल्यानंतर काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी डान्स करत आनंद साजरा केला होता. या डान्सवर आमदार रवी राणा यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

बळवंत वानखडे यांचा ब्रेक डान्स आपण पाहिल्याचे सांगत, त्यांना अशा प्रकारे आनंद व्यक्त करण्याची गरज नव्हती, असा टोला रवी राणांनी लगावला. चिखलदरा नगरपरिषदेत काँग्रेसतर्फे निवडून आलेले बहुतांश नगरसेवक हे आपले समर्थक असून रवी राणा यांनाच मानणारे आहेत, असा मोठा आणि खळबळजनक दावा त्यांनी केला.

“थोड्याच दिवसांत याचा परिणाम दिसून येईल,” असे सांगत रवी राणांनी सूचक इशारा दिला. त्यांच्या या दाव्यानंतर चिखलदरा नगरपरिषदेत नगरसेवकांची फोडाफोडी होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

—————

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी

You Might Also Like

बावनकुळे यांचा तो व्हिडिओ भाजपच्याच गटाने दिला राऊत
एकमेकाच्या सहकार्याने खूप मोठे काम उभे करता येते – उदयनराजे भोसले | BulletsIn
ठाणे-मुलुंड दरम्यान ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक
पुणे विमानतळावरून उड्डाण-लँडिंगचा उच्चांक – Hindusthan Samachar Marathi
राज ठाकरे यांचे अमरावतीत आगमन

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article जळगाव -सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी
Next Article मॉस्कोत एका कारमध्ये भीषण बॉम्बस्फोट; रशियन जनरलचा मृत्यू
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?