नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर : दिल्ली अबकारी घोटाळा प्रकरणी आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांना दिल्लीतील न्यायालयाने 5 दिवसांची ईडी कोठडी सुनावली. ईडीने 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. परंतु, कोर्टानेच प्रश्न उपस्थित करत निर्णय दिला आहे.
संजय सिंह यांचा मोबाईल ताब्यात घेतलेला असताना आता त्यांची कोठडी कशासाठी हवीय, असा सवाल कोर्टाने ईडीला विचारला होता. यावर ईडीने पैशांच्या देवानघेवाणीचा हवाला देत ही रक्कम 2 कोटींची आहे. तसेच संजय सिंह यांचा कर्मचारी सर्वेश मिश्र याने या व्यवहाराची कबुली दिली आहे. सरकारी साक्षीदार बनलेल्या दिनेश अरोडा यानेच सिंह यांना फोन करून पैसे मिळाले का, हे कन्फर्म केले होते. याचबरोब ईडीने आणखी तीन लोक आहेत, ज्यांची चौकशी करायची आहे. सिंह यांच्यासोबत त्यांची चौकशी करायची आहे, असे ईडीने न्यायालयास सांगितले.
