नाशिक – नागरिकांनी सत्ता हातामध्ये दिल्यानंतर शेतकरी गोरगरीब जनतेसाठी सरकारची दारे हे खुली राहतील आणि त्यांना सर्व ती मदत केली जाईल, असे आश्वासन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी दिले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे दाखल झाली. या ठिकाणी मालेगाव हून ही यात्रा आल्यानंतर या यात्रेचे स्वागत जिल्ह्यातील काँग्रेसचे नाशिक शहराध्यक्ष आकाश छाजेड जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे, यांच्यासह अन्य नेत्यांनी केले यावेळी या किसान मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या किसान मेळाव्याला समोरीत करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांबाबत कोणतेही स्पष्ट धोरण घेतले नाही त्यामुळे दहा वर्षात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे आणि या नुकसानीला सर्वस्व केंद्र सरकार जबाबदार आहे, असा आरोप करून शरद पवार यांनी कोट्यावधी रुपयांच्या नुकसानीमुळे शेतकरी पूर्णतः उध्वस्त झाल्याची टीका देखील यावेळी केली आहे.
या किसान मेळाव्याला संबोधित करताना गांधीनी सांगितले की, आज केंद्र सरकारने देशातील 70 हजार कोटी जनतेला वेळेत बनवला आहे. त्यामुळे जनतेला कुठलाही फायदा झालेला नाही. फक्त देशातील 22 श्रीमंत लोकांसाठी सरकार काम करत आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर सरकारला काहीही एक घेणं देणं नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी सांगितले की, केंद्रामध्ये काँग्रेस आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले जातील त्यांचे कर्ज माफ केले जाईल सर्वसामान्य गरीब जनतेला आणि शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नासाठी सरकारकडे आपलं सरकार म्हणून प्रश्न मांडण्यासाठी दरवाजे हे नेहमीच उभे राहतील असे सांगून राहुल गांधी पुढे म्हणाले की, आज सर्वांना आम्ही बरोबर घेऊन जात आहोत आणि त्याच्या सरकारने देश बरबाद केल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.
