अमरावती, महापालिकेने पल्स पोलिओ लसीकरणासाठी निश्चित केलेले उद्दिष्ट पूर्ण केले आहे. सहा दिवसांच्या कालावधीत सुमारे ६७,१०७ बालकांना पोलिओचा डोस दिला.
महापालिका आयुक्त देविदास पवार, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त (प्रशा.) डॉ.मेघना वासनकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. महापालिकेने ६७,६५४ बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यानुसार सहा दिवस लसीकरण करण्याची मोहीम राबविण्यात आली. सहा दिवसांमध्ये एकूण ६७,१०७ बालकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. तसेच महापालिकेतर्फे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आले असून ९९ टक्के पुर्ण करण्यात आले.
महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे म्हणाले, ‘‘पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी ३ ते ९ मार्च दरम्यान मोहीम राबविली. त्यासाठी शहरात लसीकरण केंद्रांसह विविध दवाखाने, बस, एसटी स्थानके, रेल्वे स्थानके अशा विविध ठिकाणी पोलिओ डोस देण्यासाठी व्यवस्था केली होती. ६७,१०७ बालकांना डोस देवून लसीकरण करण्यामध्ये महापालिकेला यश आले.
