cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > सामाजिक सुधारणांच्या बाबतीत वल्लालर काळाच्या पुढे होते – पंतप्रधान
National

सामाजिक सुधारणांच्या बाबतीत वल्लालर काळाच्या पुढे होते – पंतप्रधान

CliQ INDIA
Last updated: October 6, 2023 2:24 am
CliQ INDIA
Share
5 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर (हिं.स.) : सामाजिक सुधारणांच्या बाबतीत वल्लालर यांचे विचार काळाच्या पुढचे होते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. श्री रामलिंग स्वामी ज्यांना वल्लालर म्हणूनही ओळखले जात होते. त्यांच्या 200 व्या जयंती सोहळ्याला पंतप्रधानांनी संबोधित केले.

या सोहळ्यामध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन वल्लालर यांच्याशी अतिशय जवळचा संबंध असलेल्या वडालूर या ठिकाणी केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. वल्लालर हे भारतामधील सर्वाधिक आदरणीय संतांपैकी एक होते, जे 19व्या शतकात पृथ्वीवर अवतरले आणि त्यांची आध्यात्मिक शिकवण आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे, असे ते म्हणाले. वल्लालर यांचा प्रभाव जागतिक असून अनेक संघटना त्यांचे विचार आणि सिद्धांतावर काम करत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित करून सांगितले.

“ज्यावेळी आपण वल्लालर यांचे स्मरण करतो त्यावेळी आपल्याला त्यांच्या सेवा आणि करुणा या भावनेची आठवण होते” पंतप्रधान म्हणाले. आपल्या सोबतच्या मनुष्यमात्रांविषयी करुणेला प्राथमिक मानणाऱ्या जीवनशैलीवर वल्लालर यांचा विश्वास होता, असे पंतप्रधानांनी सांगितले. उपासमारीचे उच्चाटन करण्याविषयीचे त्यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान आणि बांधिलकी पंतप्रधानांनी अधोरेखित केली. उपाशी पोटी झोपणाऱ्या मानवाचे दुःख त्यांच्यासाठी सर्वात मोठे दुःख होते. भुकेल्याला आपल्याकडे असलेले अन्न देणे हे दयाळूपणाच्या सर्वात मोठ्या कार्यांमधील अतिशय उदात्त कार्य आहे, अशी त्यांची धारणा होती. वल्लालर यांचे विचार उद्धृत करत पंतप्रधान म्हणाले, “ ज्या ज्या वेळी मी सुकून जात असलेली पिके पाहतो, त्या वेळी मी स्वतः देखील सुकून जातो”. सरकार देखील त्यांच्या याच आदर्शाबाबत वचनबद्ध आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. यावेळी त्यांनी कोविड महामारीच्या अतिशय मोठ्या आपत्तीदरम्यान सरकारची परीक्षा पाहणाऱ्या काळात 80 कोटी भारतीय बांधवांना मोफत अन्नधान्य पुरवून सरकारने मोठा दिला दिलासा दिल्याचे उदाहरण दिले.

ज्ञान आणि शिक्षणाच्या शक्तीवर, वल्लालर यांचा प्रगाढ विश्वास होता, असे सांगत, कुणालाही मार्गदर्शनासाठी ते नेहमीच तत्पर असत. त्यांनी आपल्या आयुष्यात अगणित लोकांना मार्गदर्शन केले. असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. कुरलला अधिकाधिक लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले, तसेच आधुनिक अभ्यासक्रमाला वल्लालर यांनी खास महत्त्व दिले होते, असेही पंतप्रधानांनी सांगितले होते. युवकांनी तामीळ, संस्कृत आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवावे, असे वल्लालर यांना वाटत होते, असे सांगून, गेल्या नऊ वर्षात शिक्षणव्यवस्थेतील पायाभूत सुविधा क्षेत्रात आमूलाग्र बदल आणण्यासाठी त्यांच्या सरकारने केलेल्या प्रयत्नांची माहिती पंतप्रधानांनी दिली. देशाला तीन दशकांनंतर नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मिळाले असेही त्यांनी सांगितले. हे धोरण नवोन्मेष, संशोधन आणि विकास अशा गोष्टींवर भर देत, देशातील संपूर्ण शिक्षण परिदृश्य परिवर्तीत करत आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. देशात गेल्या नऊ वर्षात,विक्रमी संख्येने विद्यापीठे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली जात असून, आता युवा विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या भाषेत देखील अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण घेऊ शकतात, ज्यातून त्यांना आणखी अनेक संधी उपलब्ध होतील, असे पंतप्रधान म्हणाले.

“सामाजिक सुधारणांच्या बाबतीत वल्लालर यांचे विचार काळाच्या पुढचे होते.”असे सांगत, वल्लालर यांच्या देवाविषयीच्या कल्पनेला त्यांनी अधोरेखित केले. वल्लालर यांच्या दृष्टीने,देव, धर्म, जाती आणि वर्ण या सगळ्यांच्या पलीकडे आहे, वल्लालर यांना ब्रह्मांडातील कणाकणात दिव्यत्व दिसत असे. आज मानवतेने सुद्धा ह्याच दिव्यताची ओळख करून घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. “समतेवर आधारित समाजाच्या निर्मितीसाठी उपदेश करणाऱ्या वल्लालर यांना वंदन करतांना, सबका साथ,सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ ही आमची भूमिका अधिकच भक्कम होत आहे, असं पंतप्रधान म्हणाले. आज वल्लालर यांनी नारी शक्ती वंदन अधिनियम संमत झाल्याबद्दल आशीर्वादच दिले असते, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. वल्लालर यांच्या कार्यातील साधेपणा अधोरेखित करण्यासाठी पंतप्रधान म्हणाले की त्यांचे लेखन समजण्यास सोपे आहे, त्यांनी अत्यंत क्लिष्ट असे आध्यात्मिक ज्ञान सोप्या सुलभ भाषेत समजावून सांगितले आहे. असे ते म्हणाले. भारतातील सांस्कृतिक ज्ञानातील वैविध्य एक भारत श्रेष्ठ भारत या सामूहिक कल्पनेला बळ देणार्या महान संतांच्या शिकवणीच्या समान धाग्याने काळ आणि अवकाशाच्या पलीकडे जात जोडले गेले आहे, याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

या पवित्र प्रसंगी, पंतप्रधानांनी वल्लालर यांचे आदर्श पूर्ण करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि प्रत्येकाने त्यांचा प्रेम,दया आणि न्यायाच्या संदेशाचा प्रसार करण्याचे आवाहन केले.“त्यांच्यासाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या विषयांसाठी आपण कठोर परिश्रम करत राहू या.आपल्या आजूबाजूला कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेऊया. प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळेल याची खात्री करूया”,असे पंतप्रधान समारोप करताना म्हणाले.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

अमित शाह यांचा दोन दिवसीय ओडिशा दौरा सुरू: भुवनेश्वरमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे उद्घाटन करणार
रत्नागिरी : आमदार साळवींकडे एसीबीची झाडाझडती
विमानतळांवर ‘इकॉनॉनीझोन’ अनिवार्य करणार | BulletsIn
केरळमधील फटाके उत्पादन केंद्रातील स्फोटात १३ जण ठार, थ्रिस्सूरमध्ये दहशत
छठ पूजेनिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article पुणे – महापालिकेच्या मैदानात गांजाची झाडे
Next Article ‘भीमा’चे नाव आता ‘भीमराव महाडिक साखर कारखाना’
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?