cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आपला संकल्प पुन्हा दृढ करा – राष्ट्रपती
National

सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आपला संकल्प पुन्हा दृढ करा – राष्ट्रपती

CliQ INDIA
Last updated: November 27, 2025 6:35 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

मुंबई, 26 नोव्हेंबर (हिं.स.)।2008 च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईमध्ये झालेलेल्या दहशतवादी हल्ल्याची आज 17 वी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये मुंबई हल्ल्यात बलिदान दिलेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना आवाहन केले की त्यांनी दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आपला संकल्प पुन्हा दृढ करावा. तर राज्यसभा सदस्य उज्ज्वल निकम यांनी मुंबई हल्ल्याबाबत पाकिस्तानच्या मौनावर प्रश्न उपस्थित केले आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानला मिळणारी आर्थिक मदत बंद करण्याचे आवाहन केले.

राष्ट्रपती मुर्मू यांनी बुधवारी 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान देशाचे रक्षण करताना प्राणार्पण करणाऱ्या शूर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली आणि देशवासियांना सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आपला निश्चय पुन्हा दृढ करण्याचे आवाहन केले. राष्ट्रपतींनी सोशल मीडिया मंच ‘एक्स’वर पोस्ट करून लिहिले,

“26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्या शूर सैनिकांना विनम्र श्रद्धांजली अर्पित करते, ज्यांनी आपल्या देशातील नागरिकांचे रक्षण करताना प्राणांची आहुती दिली. देश त्यांच्या सर्वोच्च बलिदानाला कृतज्ञतेने स्मरतो. चला, सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आपला संकल्प पुन्हा दृढ करूया. आपण सर्वजण मिळून प्रगतीच्या मार्गावर पुढे जाऊ आणि एक मजबूत व समृद्ध भारत उभारण्याचा निश्चय करूया.”

राज्यसभा सदस्य आणि मुंबई हल्ल्याचे विशेष सरकारी वकील राहिलेले उज्ज्वल निकम यांनी मुंबई हल्ल्याच्या पुण्यतिथीनिमित्त बोलताना म्हटले, “या हल्ल्याला 17 वर्षे झाली. प्रत्येक भारतवासीयाला हा दिवस आठवतो. मला आठवते, जेव्हा आम्ही पाकिस्तानला गेलो होतो, तेव्हा आमच्या सरकारने मुंबई हल्ल्याचा मुद्दा उचलला होता. आम्ही हल्ल्याचे जबाबदार आणि कटकारस्थान करणाऱ्यांवर काय कारवाई झाली, याची चौकशी केली होती. त्यांनी काही लोकांना अटक केली, परंतु त्यांच्या खटल्यांबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पाकिस्तानने याबद्दल कधीच काही सांगितले नाही.”

उज्ज्वल निकम पुढे म्हणाले, “आजपर्यंत लोकांना माहिती नाही की मुंबई हल्ल्याचे साजिशकर्त्यांचे काय झाले. जेव्हा आम्ही हाफिज सईद आणि जकी-उर-रहमान लखवी यांना अटक न करण्याबाबत प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी पुरावे मागितले. आम्ही डेव्हिड हेडलीची जबानी नोंदवली असून त्याने स्पष्ट सांगितले की मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI आणि लष्कर-ए-तैय्यबा यांचा थेट संबंध आहे. आम्ही सर्व डॉसियर पाकिस्तानला पाठवले, पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. पाकिस्तान आजही शांत आहे. जर पाकिस्तानची सरकार खरोखर लोकशाहीवर विश्वास ठेवत असेल, तर ते कोणाला घाबरत आहेत?”

26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैय्यबाच्या (LeT) दहा दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत प्रवेश केला आणि तब्बल 60 तासांच्या भीषण कारवाईत 18 सुरक्षा कर्मचार्‍यांसह एकूण 166 जणांची हत्या केली होती.

—————

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

You Might Also Like

महुआ मोईत्रांचे आचार समितीच्या समन्सला उत्तर
विकसित राष्ट्रे भारताच्या नव्या आत्मविश्वासाने उदयास येत असताना व्यापारी संबंध अधिक दृढ करण्यास उत्सुक आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले
मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादीचा फडणवीसांना पाठिंबा | BulletsIn
राज्याच्या सर्वसमावेशक विकासाला गती देणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्र्यांकडून सादर
द्रमुक आज जाहीरनामा प्रसिद्ध करणार; २०२६ तामिळनाडू निवडणुकीसाठी ३१ मार्चपासून राज्यव्यापी मोहीम.

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article अयोध्या ध्वजारोहणानंतर पाकिस्तान नाराज; मुस्लीम सुरक्षेबाबत आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी
Next Article रोहित शर्मा पुन्हा एकदा आयसीसी वन-डे क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?