cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > International > अयोध्या ध्वजारोहणानंतर पाकिस्तान नाराज; मुस्लीम सुरक्षेबाबत आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी
International

अयोध्या ध्वजारोहणानंतर पाकिस्तान नाराज; मुस्लीम सुरक्षेबाबत आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी

CliQ INDIA
Last updated: November 27, 2025 6:34 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

इस्लामाबाद, 26 नोव्हेंबर (हिं.स.)। उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे असलेल्या राम मंदिराच्या शिखरावर 25 नोव्हेंबर रोजी ध्वजारोहण करण्यात आले. राम मंदिरावर झालेल्या या ध्वजारोहणामुळे रामभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र पाकिस्तानला याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्याने या समारंभावर टीका करत देशातील अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी हा एक चिंताजनक संकेत असल्याचे म्हटले आहे.पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक प्रेस रिलीज जारी केली आहे, ज्यात राम मंदिर हे पाडलेल्या बाबरी मशीद स्थळावर बांधले गेले असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे आणि भारतातील मुस्लिमांच्या वाढत्या असहिष्णुतेबद्दल आणि दुर्लक्ष बद्दल खोल चिंता व्यक्त केली.

पाकिस्तानने म्हटले की अयोध्येतील ऐतिहासिक बाबरी मशीद स्थळावर बांधलेल्या मशीद स्थळावर बांधलेल्या तथाकथित ‘राम मंदिरावर’ ध्वज फडकावण्यात आला. तसेच त्यांचा आरोप आहे की शतकांपासून अस्तित्वात असलेली बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992 रोजी “फॅसिस्ट विचारसरणीने प्रेरित झालेल्या उग्र जमावाने” पाडली. पाकिस्तानने दावा केला की मशिदीच्या विध्वंसासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींना नंतर “खटल्यातून मुक्त” करण्यात आले आणि कायदेशीर निर्णयांनी मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा केला.

पुढे पाकिस्तानने ध्वजारोहण समारंभाला व्यापक मुद्द्यांशी जोडत भारतातील मुस्लीम समुदायाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या दुर्लक्ष केले जात असल्याचा धोका कायम असल्याचे म्हटले. पाकिस्तानचा आरोप आहे की अयोध्येत झालेला हा कार्यक्रम “बहुसंख्य हिंदुत्व विचारसरणीच्या प्रभावाखाली मुस्लीम सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा नष्ट करण्याचा ठरवून केलेला प्रयत्न” आहे.

पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, भारतभरातील अनेक ऐतिहासिक मशिदींनाही अशाच धोक्यांचा सामना करावा लागत आहे आणि त्या अपवित्र केल्या जाण्याची किंवा पाडल्या जाण्याची भीती कायम आहे.

पाकिस्तानने जागतिक संस्था, संयुक्त राष्ट्र व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांना आवाहन केले आहे की त्यांनी भारतातील वाढत्या इस्लामोफोबिया आणि द्वेषपूर्ण वक्तव्यांकडे लक्ष द्यावे. तसेच मुस्लीम वारसा स्थळांचे संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय करारांनुसार अल्पसंख्याकांच्या अधिकारांची हमी मिळावी यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

पाकिस्तानने भारत सरकारला आवाहन केले आहे की मुसलमानांसह सर्व धार्मिक समुदायांच्या सुरक्षेची खात्री करून आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार त्यांच्या धार्मिक स्थळांचे संरक्षण करून आपल्या जबाबदाऱ्यांचे पालन करावे.

—————

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

You Might Also Like

युक्रेन- रशियाकडून कैद्यांच्या देवाणघेवाणीची तयारी सुरु; १,२०० युक्रेनियन सैनिक घरी परतण्याची शक्यता
पाकिस्तानमधील प्रवासी कराचीऐवजी सौदीला पोहचला
बांगलादेशात हिंदू भीतीच्या वातावरणात दुर्गा पूजा साजरी करत आहेत – सजीब वाजेद
पाकिस्तान: ट्रक उलटल्याने भीषण अपघात; एकाच कुटुंबातील १५ जणांचा मृत्यू
इराणवरील हल्ल्याच्या अंतिम आदेशाचा निर्णय ट्रम्प यांनी दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलला

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article नवले पुलाला रिंगरोडचा तोडगा – जिल्हाधिकारी डुडी
Next Article सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आपला संकल्प पुन्हा दृढ करा – राष्ट्रपती
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?