दरभंगा, 21 नोव्हेंबर (हिं.स.) : बिहारच्या दरभंडा नजीकच्या फुलपरास येथे जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या वाहनाने चौघांना चिरडल्याची घटना आज, मंगळवारी घडली. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या (डीएम) ड्रायव्हरले घटनास्थळाहून पळ काढला आहे.
डीएम विजय प्रकाश मीणा आज सकाळी त्यांच्या स्टाफसह दरभंगाहून परतत होते. यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्र. 57 वर त्यांच्या वाहनाने रस्त्याच्या बाजुला पट्ट्या रंगविणाऱ्या मजुराला उडविले. यानंतर त्यांची कार अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या दुसरीकडे जात महिला आणि एका मुलाला चिरडले. या तिघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर आणखी एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. मधेपुरा जिल्हा प्रशासन यावर काही बोलण्यास असमर्थता दर्शवत आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, डीएमच्या कारमध्ये डीएम, ड्रायव्हर, एक अंगरक्षक आणि एक मुलगी होती. घटनेनंतर काही दुचाकी तेथे आल्या आणि त्यांना घेऊन गेल्या. नागरिकांनी रस्ता जाम केला होता.
हिंदुस्थान समाचार
