नाशिक, २९ नोव्हेंबर, (हिं.स) : संपुर्ण भारत देशाचे लक्ष लागले असलेल्या उत्तर काशी येथील सिलक्यारा बोगदयात अडकलेल्या 41 श्रमिकांची सुखरुप सुटका करण्यात आल्याने भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्यावतीने पंचवटीतील काळाराम मंदिर येथे प्रभु श्रीरामाची आरती करून ‘एनडीआरएफ’ व ‘एसडीआरएफ’ चे जवान यांचे आभार व अभिनंदन करण्यात आले.
सलग 17 दिवस हे बचाव कार्य सुरु होते या सर्व घटनेवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे लक्ष ठेवून होते. तसेच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी हे स्वत: घटनास्थळी उपस्थित राहून या रेसक्यु ऑपरेशनवर लक्ष ठेवून होते. संपुर्ण देश दिवाळीचा आनंद साजरा करत प्रकाशमय झालेला असतांना लक्ष्मीपुजनाच्या दिवशी सायं.6 वाजेच्या सुमारास हि घटना घडून यामध्ये 41 श्रमिक अडकून होते. तब्बल 17 दिवस हे बचाव कार्य सुरु होते. याला यश आल्यानंतर प्रभु श्रीरामाचे आरती करून भाजपाने सर्वांचे आभार व्यक्त केले आहे. तसेच रिसक्यु ऑपरेशन मध्ये पुण्याच्या कंपनीचा देखील सहभाग असल्याने त्या कंपनीचे देखील भाजपाने अभिनंदन केले आहे.
याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव, उपाध्यक्ष धनंजय पुजारी, चंद्रशेखर पंचाक्षरी, अमित घुगे, दिगंबर धुमाळ, शाम पिंपरकर, राम डोबे, सोमनाथ बोडके, ॲड.मिनल भोसले, महेश महंकाळे, वसंत उशीर, विजय बनछोडे, प्रविण भाटे, प्रशांत वाघ, मधुकर बोरसे, सुरेश मानसिंघानीया, प्रियंका कानडे, उल्हास धनवटे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
