नवी दिल्ली, 25 डिसेंबर (हिं.स.) : देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंतप्रधानांनी अटल बिहारी वाजपेयींच्या समधीस्थळी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. तसेच सोशल मिडीयावर संदेश जारी करत अभिवादन केलेय.
यासंदर्भात ट्विटरवर (एक्स) जारी केलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले की, देशाच्या वतीने मी माजी पंतप्रधान आदरणीय अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. त्यांनी आयुष्यभर राष्ट्र उभारणीसाठी कार्य केले. भारत मातेसाठी त्यांचे समर्पण आणि सेवा हे कायम प्रेरणास्थान राहणार असल्याचे मोदंनी आपल्या संदेशात नमूद केले आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील श्रद्धांजली अर्पण केलीय.
हिंदुस्थान समाचार
