नाशिक, ११ डिसेंबर (हिं.स.) – जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव सोमवारी सुरू झाले पण कांद्याचे भाव मात्र २५ रुपये प्रतिक्विंटलपेक्षा पुढे जाऊ शकले नाहीत.
केंद्र सरकारने गुरुवारी कांद्याच्या निर्यातीला 31 मार्च 2024 पर्यंत बंदी टाकली होती. त्यानंतर शुक्रवारपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी सुरू असलेले कांद्याचे लिलाव हे बंद पडले होते. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी होण्याचा निर्णय घेतला आणि व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मागील तीन दिवसापासून कांद्याचे लिलाव हे सुरू होऊ शकले नाही. त्यानंतर सहकार विभागाच्या वतीने जिल्ह्यातील जिल्ह्यातील कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर सोमवारी कांद्याचे लिलाव सुरू होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच जिल्ह्यातील प्रमुख बाजार समिती यांनी कांद्याचे लिलाव सोमवारी सुरू केले आहेत यामध्ये लासलगाव, नाशिक, पिंपळगाव, नांदगाव या बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव सुरू झाले मात्र गुरुवारपर्यंत कांद्याचे असलेले भाव हे चार हजारावरून कोसळून अडीच हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आले आहेत. येणाऱ्या काळात हे भाव अजून कोसळण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केली आहे.
हिंदुस्थान समाचार
