छत्रपती संभाजीनगर, 26 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर – सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्गावरील औट्रमघाटमार्ग (कन्नड-चाळीसगाव मार्ग) या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या कामास केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे.
या प्रकल्पाअंतर्गत ५.५ किमी लांबीचा बोगदा व १५ किमी रस्त्याचे बांधकाम ₹२,४३५ कोटींच्या निधीतून करण्यात येणार आहे.
ही ऐतिहासिक कामगिरी केंद्राचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मुळे शक्य झाली आहे.
या प्रकल्पामुळे औट्रमघाटाचा धोकादायक वळणावळणाचा रस्ता इतिहासजमा होऊन वाहतुकीची सुलभता, पर्यटन वाढ, औद्योगिक विकास आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे.
औट्रम घाटात १४.८९ किलो मीटर लांबीचा रस्ता होणार. रस्त्यावर ५.५० किलोमीटर लांबीचा बोगदा राहणार. भोगद्यातून वाहनांसाठी तासी १०० किलोमीटर वेग मार्यादा निश्चित केली आहे..
—————
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis
