नवी दिल्ली, 01 डिसेंबर (हिं.स.) : शेअर बाजाराशी संबंधीत महत्त्वाचा निर्णय बाजानियमकने (सेबी) घेतला आहे. त्यानुसार आयपीओ सूचीकरणाचा कालावधी 6 दिवसांहून 3 दिवस करण्यात आलाय. यामुळे आयपीओ इश्यू बंद झाल्यावर कंपन्यांना 3 दिवसात शेअर्स लिस्ट करता येणार आहे.
सेबीने आयपीओ सूचीकरणाची वेळ 6 दिवसांवरून 3 दिवसांवर आणली आहे. याचा अर्थ आता आयपीओ इश्यू बंद झाल्यानंतर शेअर बाजारात कंपन्यांच्या शेअर्सची लिस्ट 3 दिवसांत करता येणार आहे. पूर्वी हे काम 6 दिवसांत व्हायचे. सेबीच्या या निर्णयामुळे आयपीओ मार्केटमध्ये लिस्टिंगची प्रक्रिया जलद होणार असून गुंतवणूकदारांना लिस्टिंगसाठी फारशी प्रतीक्षा करावी लागणार नाही. तसेच, जर आयपीओ मध्ये शेअर्सचे वाटप झाले नाही तर परतावादेखील लवकरच मिळणार आहे.
हिंदुस्थान समाचार
