अमरावती, 22 नोव्हेंबर (हिं.स.) : अध्यात्म हे जगासाठी भारताने दिलेली बहुमूल्य देणगी असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. आंध्र प्रदेशातील पुट्टपार्थी येथे श्री सत्य साई उच्च शिक्षण संस्थेच्या 42 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून संबोधित केले.
वेळोवेळी महान आध्यात्मिक व्यक्तींनी सदाचार, करुणा आणि लोककल्याणाचा संदेश दिला आहे. श्री सत्य साई बाबा हे असेच एक महान व्यक्तिमत्व होते. त्यांच्या अस्तित्वामुळे पुट्टपार्थीचा परिसर पवित्र झाला. लाखो लोकांना त्यांच्या आशीर्वादाचा लाभ मिळत आहे आणि मिळत राहील. या संस्थेने शैक्षणिक प्रक्रियेत शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक आणि आध्यात्मिक पैलू समाविष्ट केले आहेत, असे राष्ट्रपतींनी आवर्जून नमूद केले.
हिंदुस्थान समाचार
