नवी दिल्ली: देशातील विविध राज्यांमधील धान्याचे घाऊक विक्रेते आणि किकोळ व्यापारी यांनी त्यांच्याकडील गहू साठ्याची माहिती आठवड्यातील दर शुक्रवारी https://evegoils.nic.in/wheat/login.html या पोर्टलवर जाहीर करणे अनिवर्य करण्यात आलेय.
एकंदर अन्नसुरक्षेचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि साठेबाजी आणि कृत्रिम भाववाढ करण्यासाठी होणारी भाकिते रोखण्यासाठी भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे. आगामी 1 एप्रिल 2014 पासून पुढील आदेशापर्यंत हे अनिवार्य असल्याचे सरकारने स्पष्ट केलेय. गव्हाच्या साठ्याची सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्व श्रेणीतील संस्थांसाठी साठवणुकीची मर्यादा 31 मार्च रोजी समाप्त होत आहे. त्यानंतर सर्व संस्थांना गव्हाचा साठा पोर्टलवर जाहीर करावा लागेल. तांदळाच्या साठ्याची सर्व श्रेणीतील संस्थांकडून माहिती देण्याचे आदेश यापूर्वीच लागू आहेत. ज्या संस्थेने पोर्टलवर नोंदणी केली नसेल, त्यांनी ती करून घ्यावी आणि दर शुक्रवारी गहू आणि तांदूळ यांच्या साठ्याची माहिती जाहीर करावी. आता सर्व कायदेशीर संस्थांनी पोर्टलवर नियमितपणे गहू आणि तांदूळ यांच्या साठ्याची माहिती जाहीर केली पाहिजे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग गहू आणि तांदळाच्या साठ्यावर भाववाढ रोखण्यासाठी आणि देशभरात त्यांची सहजपणे उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी अतिशय बारकाईने लक्ष ठेवून आहे.
