cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > दिलीप प्रभावळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ‘दशावतार’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
Entertainment

दिलीप प्रभावळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ‘दशावतार’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

CliQ INDIA
Last updated: August 5, 2025 6:31 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 4 ऑगस्ट (हिं.स.)।मराठी चित्रपटसृष्टीत भव्यतेचं नवं पर्व घेऊन येणाऱ्या ‘दशावतार’ या आगामी चित्रपटाचा जबरदस्त टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांच्या उत्सुकतेला चांगलंच उधाण आलं आहे. प्रतिभावान अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘दशावतार’ हा चित्रपट येत्या १२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित या चित्रपटात मराठीतील दिग्गज आणि अत्यंत ताकदीचे कलाकार एकत्र आले असून दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव,विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनय बेर्डे अशा दर्जेदार कलाकारांची मांदियाळी या चित्रपटाच्या टिझरमध्ये दिसून आली आहे.

‘दशावतार’ हा चित्रपट केवळ एक सस्पेन्स थ्रिलर नसून, भावनांचा, रूढी परंपरांचा, पारंपरिक लोककलेचा आणि आधुनिक आव्हानांचा खेळ असावा असं या टिझरमधून लक्षात येत आहे. टीझरमध्ये दाखवलेली दृश्ये गूढता, भव्यता आणि थरार निर्माण करणारी आहेत. प्रत्येक पात्राची झलक दाखवणारा हा टिझर प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आणि चित्रपटाची उत्सुकता अधिक ताणणारा आहे. कोकणातील भव्य निसर्ग दृश्ये, दशावतारी कलेशी संबंधित दृश्य आणि घनदाट अरण्य पाहून हा नेहमीपेक्षा वेगळा अनुभव देणारा चित्रपट असेल याची खात्री पटते आहे.

चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर म्हणतात, “‘दशावतार’ ही कोकणातील मातीशी घट्ट जुळलेली पण जगभरातल्या प्रेक्षकांना सहज आपलीशी वाटेल अशी गोष्ट आहे. त्यातली भव्यता, थरारक प्रसंग आणि भावनिक क्षण हे प्रेक्षकांना आजवर न पाहिलेला अनुभव देतील अशी खात्री आहे. हा अनुभव घ्यायला चित्रपटगृहातच यावं लागेल अशा पद्धतीचा हा चित्रपट आहे!”

चित्रपटाचे निर्माते सुजय हांडे म्हणतात, “या चित्रपटाच्या भव्यतेची झलक टीझरमध्येच दिसून येते. यात प्रेक्षकांना सिनेमॅटिकली काहीतरी नवीन आणि वेगळं पाहायला मिळणार आहे. अनुभवी कलाकारांच्या जबरदस्त अभिनयाने चित्रपट अधिक उठून दिसतो.”

या चित्रपटाबाबत झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात,“‘बदलत्या काळानुसार मराठी प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची अभिरुचीसुद्धा बदलत आहे. हीच बाब लक्षात घेऊन दर्जा सोबतच नाविन्याची जोड असणाऱ्या कथांना प्राधान्य देण्याचे काम झी स्टुडिओज करत आहे. प्रेक्षकांना आपल्या मातीतील गोष्ट अतिशय वेगळ्या ढंगाने सांगणारा हा चित्रपट असून या चित्रपटामुळे प्रेक्षकांमध्ये आणि सिने सृष्टीमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल असा विश्वास झी स्टुडिओच्या टीमला आहे.

—————

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

You Might Also Like

तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी अभिनेता फिश वेंकटचं निधन
'श्रीमद् रामायण'मध्ये 3 जानेवारी रोजी प्रसारित होणार राम लल्लाच्या जन्माचा सोहळा
कोकणची रंगभूमी राज्याबाहेर पोचली पाहिजे – विजय गोखले
आयपीएल सामन्यानंतर वानखेडेबाहेर सारा अर्जुनला चाहत्यांचा गराडा, ‘धुरंधर २’ च्या यशाची लाट!
मायकेल जॅक्सनच्या बायोपिकचा टीझर प्रदर्शित

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article डब्ल्यूटीटी स्टार कंटेंडर स्पर्धा – मानव ठक्कर आणि मानुष शाहला पुरुष दुहेरीचे उपविजेतेपद
Next Article पालघर – स्टेट बँकेचे एटीएम फोडून साडे चौदा लाखांची रोकड चोरली
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?