मुंबई, 3 जानेवारी (हिं.स.) सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील श्रीमद् रामायण मालिकेचा, 3 जानेवारी 2024 रोजी प्रसारित होणारा आगामी एपिसोड, या गाथेतील एक महत्त्वपूर्ण आणि मनमोहक क्षण – राम लल्लाचा दिव्य जन्म साजरा करण्यास सज्ज आहे.
सदाचरण, विवेक आणि कर्तव्यनिष्ठेसाठी प्रसिद्ध – राजा दशरथाने अयोध्येच्या समृद्ध राज्यावर राज्य केले, परंतु आपले राज्य पुढे चालवण्यासाठी त्याला पुत्र संतती नव्हती. तथापि, राजा दशरथ आणि त्याच्या पत्नींनी केलेल्या यज्ञाद्वारे त्यांना पुत्रप्राप्तीचे वरदान मिळाले, परिणामी राणी कौसल्येच्या पोटी भगवान राम जन्मला, राणी कैकेयीच्या पोटी भरत जन्मला तर राणी सुमित्रेच्या पोटी लक्ष्मण आणि शत्रुघ्न ही जुळे पुत्र जन्मले.
दशरथ राजाच्या जीवनातील या महत्त्वपूर्ण टप्प्यावर भाष्य करताना आरव चौधरी म्हणाला, “राजा दशरथाची भूमिका साकारणे ही मोठी जबाबदारी आहे आणि या महाकाव्यातील ही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारण्याची संधी लाभल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. भगवान रामचंद्राच्या पित्याची भूमिका मला दिली, हा एक सन्मान आहे, ज्याला माझ्या हृदयात कायमच एक विशेष स्थान असेल. मला आशा आहे की मी या भूमिकेला न्याय देत आहे आणि ज्येष्ठ पुत्र राम लल्लाच्या आगमनाने राजा दशरथाला झालेला अत्यानंद आणि आणि कृतकृत्यतेची भावना पडद्यावर जिवंत करण्यात यशस्वी झालो आहे. सेटवरील या दैवी क्षणाचे शूटिंग करताना मला माझ्या स्वतःच्या मुलाच्या जन्माची आठवण झाली, प्रत्येक माता-पित्यासाठी – आपल्या अपत्याला पहिल्यांदा हातात घेणे हा एक जादुई क्षण असतो.”
श्रीरामाचा जन्म वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे, मानवतेसाठी प्रकाशाचा दिवा आहे, जो लक्षावधी लोकांना सद्गुण, कर्तव्यपरायणता आणि भक्तीच्या आदर्शांनी प्रेरित करतो. एक कुटुंब म्हणून एकत्र या आणि भगवान राम व त्यांचे उदात्त कर्तृत्व यांनी भारावलेल्या दिव्य दुनियेचा अनुभव घ्या. 3 जानेवारी 2024 रोजी राम लल्लाच्या जन्माचे साक्षीदार होण्यासाठी ‘श्रीमद् रामायण’ बघा, फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!
‘श्रीमद् रामायण’ केवळ केबल टिव्ही आणि डीटीएचवर बघता येईल.
हिंदुस्थान समाचार
