मुंबई, 16 डिसेंबर (हिं.स.)
झी मराठीचा चर्चित रिऍलिटी शो ‘जाऊ बाई गावात मध्ये रोज नवीन नवीन कार्य स्पर्धकांच्या भेटीस येतात. गावकऱ्यांसोबत राहता राहता काही स्पर्धक उत्सुकतेने कार्य करतात तर काहींसाठी त्या कार्यचा विचार करणे ही तारेवरची कसरत आहे. गावात रोज एक नवा पाहुणा येतो आणि मजेशीर कार्यही सोबत घेऊन येतो. पण येणाऱ्या भागात एक नाही तीन खास पाहुणे येणार आहेत.
पहिला पाहुणा आहे लावणी साम्रा सुरेखा पुणेकर, सर्वांची लाडकी अभिनेत्री पूजा सावंत आणि कोरिओग्राफर मयूर वैद्य आले आहेत लोककलेशी जोडलेलं कार्य घेऊन. स्पर्धकांना लावणीच प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि त्याच्यासाठी मंच तयार आहे. सगळे गावकरी स्पर्धकांची लावणी बघायला येणार. हे कार्य ठरवणार कोण ह्या गेम शो मध्ये राहणार आणि आपला सामान बांधून घरी रवाना होणार. प्रेक्षकांसाठी पूजा सावंत, मयूर वैद्य आणि सुरेखा पुणेकर यांचे खास परफॉर्मन्स बघायला मिळणार आहेत.
हिंदुस्थान समाचार
