cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > एण्ड टीव्हीची नवीन मालिका 'अटल'
Entertainment

एण्ड टीव्हीची नवीन मालिका 'अटल'

CliQ INDIA
Last updated: November 24, 2023 11:30 am
CliQ INDIA
Share
6 Min Read
SHARE

मुंबई, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : भारताच्या इतिहासात अनेक पंतप्रधान परिवर्तनवादी नेते म्हणून उदयास आले आहेत. त्यांनी त्यांचा उत्तम दृष्टिकोन व संकल्पनेसह देशाला निर्णायक क्षणांमधून मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, ज्यामुळे देशाच्या भविष्याला आकार मिळाला आणि जागतिक स्तरावर देश अग्रस्थानी पोहोचण्यास मदत झाली. धोरणात्मक दृष्टिकोन व निर्णायक कृतींच्या माध्यमातून या नेत्यांनी इतिहासात आपली नावे कोरली आणि अतूट वारसा निर्माण केला, ज्यामधून अभूतपूर्व यश व प्रगतीचे युग सुरू झाले. असेच एक प्रमुख नेते म्हणजे दिवंगत अटलबिहारी वाजपेयी.

अटल बिहारी वाजपेयी हे एक प्रभावशाली राजकारणी होते आणि भारतीयांनी त्यांचा वारसा मोठ्या आदराने जपला आहे. एण्ड टीव्ही आपली नवीन मालिका ‘अटल’च्या माध्यमातून त्यांच्या बालपणाबाबत न सांगण्यात आलेल्या पैलूंना सादर करण्यास सज्ज आहे. युफोरिया प्रॉडक्शन्सद्वारे निर्मित ही मालिका भारताच्या भवितव्याला आकार देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या या नेत्याच्या सुरूवातीच्या काळाला दाखवणार आहे. भारतातील ब्रिटीश वसाहतवादी राजवटीच्या पार्श्वभूमीवर ही मालिका अटलबिहारी वाजपेयी यांच्या बालपणाला सादर करेल. तसेच घटना, विश्वास व आव्हानांवर प्रकाश टाकेल, ज्यामुळे ते महान नेते ठरले. या मालिकेचे कथानक त्यांचे विश्वास, मूल्य व विचारसरणीवर मोठा प्रभाव टाकलेल्या त्यांच्या आईसोबतचे त्यांच्या नात्याला दाखवेल. एकीकडे भारत ब्रिटीश राजवटीत गुलामगिरीचा सामना करत होता तर दुसरीकडे अंतर्गत वादविवाद व संपत्ती, जात, भेदभाव याला तोंड देत होता. अटल यांच्या आईने अखंड भारताची संकल्पना केलेले स्वप्न हे त्यांनी मनापासून जपले होते. मालिकेचे कथानक विनम्र कुटुंबातील प्रामाणिक मुलगा आणि भारताचे महान नेते अटल बिहारी वाजपेयी यांची प्रेरणादायी कथा सादर करते.

एण्ड टीव्हीवरील नवीन मालिका ‘अटल’बाबत एण्ड टीव्हीचे बिझनेस हेड विष्णू शंकर म्हणाले, ”एण्ड टीव्हीमध्ये आम्ही प्रेक्षकांशी संलग्न होणारे आणि संबंधित व अर्थपूर्ण कथानकाच्या माध्यमातून त्यांना प्रेरित करणारे कन्टेन्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आमची नवीन मालिका ‘अटल’ श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या सुरूवातीच्या काळाला सादर करणारी लक्षवधेक कथा आहे. एक प्रख्यात नेता, कवी व वक्ता म्हणून त्यांची प्रतिमा सर्वांना माहित आहे, पण त्यांच्या बालपणाबाबत बहुतेकांना माहित नाही. या मालिकेचे कथानक त्यांच्या सुरूवातीच्या काळाला आणि त्यांचे विश्वास व मूल्यांना आकार दिलेल्या, तसेच उत्तम व्यक्ती व नेता बनण्यास प्रेरित केलेल्या आव्हानांना दाखवते. आम्हाला प्रेक्षकांसमोर त्यांची गाथा सादर करण्यास सन्माननीय वाटत आहे. आम्ही आशा करतो की, प्रेक्षक मालिका पाहण्याचा आनंद घेण्यासह त्यामधून प्रेरित होतील.”

मालिकेचे निर्माता, युफोरिया प्रॉडक्शन्सचे आरव जिंदाल म्हणाले, ”बुद्धी व वक्तृत्वाचे दूरदर्शी नेतृत्व श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी भारतीय राजकारणावर निरंतर वारसा निर्माण केला. राजकीय क्षमता, वैयक्तिक मोहकता आणि देशाच्या कल्याणाप्रती अविरत कटिबद्धतेसह ते भारताच्या इतिहासामधील आदरणीय नेते आहेत. वाजपेयी यांनी राजकीय क्षेत्राला नवीन आकार दिला, राजकारणामध्ये आपल्या मूळ संस्कृतीची भर केली. आर्थिक विकासाला चालना देणारे राजकारणी असलेल्या त्यांनी अनेक भेदभाव दूर केले आणि लोकांची प्रशंसा मिळवली. त्यांच्या निर्णयांमुळे भारताने जागतिक स्तरावर अग्रणी दिशेने वाटचाल सुरू केली, ज्यामध्ये त्यांची प्रगल्भ बुद्धी व दूरदृष्टी समाविष्ट होती. वाजपेयी यांचे सर्वसमावेशक नेतृत्व, प्रगती व एकतेला चालना देण्याचा दृष्टिकोन आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, जो आजही राजकीय क्षेत्रात महत्त्वाचा आहे. आमची मालिका ‘अटल’ आजच्या पिढीला त्यांचा कालातीत वारसा आणि करिष्माई व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते, तसेच त्यांच्या बालपणीच्या न सांगण्यात आलेल्या गोष्टींना सादर करते.”

मालिका ‘अटल’च्या लेखिका शांती भूषण म्हणाल्या, ”श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी भारतीय राजकारणाला नवीन आकार दिला, ज्यामध्ये आपला सांस्कृतिक वारसा सामावलेला आहे. भारतीय मूल्ये व परंपरांप्रती त्यांच्या सखोल संबंधाने राजकारणाला विशिष्ट ओळख मिळवून दिली. वाजपेयी यांचा राजकीय वारसा, अभिमान, देशप्रेम आणि देशभक्तीने संघटित भारताचा पाया रचला गेला. आज जागतिकीकरणाच्या युगामध्ये आपली ओळख व राष्ट्रीयत्व टिकवून ठेवणे आव्हानात्मक आहे. आमची मालिका ‘अटल’ आजच्या पिढीला प्रेरित करेल, त्यांना त्यांच्या विचारांना चालना देण्यास व्यासपीठ प्रदान करेल, ज्यामुळे जागतिक स्तरावर आपल्या देशाचा अभिमान उंचावेल. वाजपेयी यांची जीवनगाथा लक्षवेधक कथानक आहे, जे आजच्या तरूणांना भारताची सांस्कृतिक विविधता व महत्त्वाला जागतिक स्तरावर घेऊन जाण्याप्रती योगदान देण्यास मार्गदर्शन करते.”

यंग अटल म्हणून आपल्या भूमिकेबाबत सांगताना व्योम ठक्कर म्हणाला, ”मी यंग अटलची भूमिका साकारण्यासाठी खूप उत्साहित आहे आणि तितकाच आभारी देखील आहे. मी त्यांच्याबाबत इतिहासाच्या पुस्तकांमध्ये वाचले होते आणि माझ्या आईवडिलांकडून ऐकले होते, पण टेलिव्हिजन मालिकेमध्ये त्यांच्या बालपणीची भूमिका साकारेन असा कधीच विचार केला नव्हता.”

कृष्णादेवी वाजपेयीच्या भूमिकेबाबत सांगताना नेहा जोशी म्हणाल्या, ”मला अटल यांची आई कृष्णादेवीची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल सन्माननीय वाटत आहे. कृष्णादेवी यांना इतिहास व राजकारणाची आवड असताना देखील त्या पती वाजपेयी जी यांच्या एकनिष्ठ समर्थक बनल्या. जीवनात आपल्या कुटुंबामध्ये एकोपा राखण्यासह त्या पतीच्या निर्णयामागे ठामपणे उभ्या राहिल्या. दृढनिश्चय व सखोल धार्मिक निश्चयासह त्यांनी शांतपणे ब्रिटीश वसाहतवाद राजवटीला विरोध केला, भारताच्या स्वातंत्र्याची इच्छा व्यक्त केली. कृष्णादेवी मुलगा अटलच्या जीवनाला आकार देते. त्या त्याच्यामध्ये यथास्थितीबाबत प्रश्न विचारण्याप्रती अविरत दृष्टिकोन व क्षमता निर्माण करतात. त्या जगासमोर आपले मत व्यक्त करत नाही, पण त्यांची आपला लाडका देश भारताला स्वातंत्र्य होताना पाहण्याची इच्छा आहे. कुटुंबाप्रती अविरत कटिबद्धता, वसाहतवादी अत्याचाराविरोधात आवाज आणि स्वत:च्या मुलाचे भवितव्य घडवण्यामध्ये प्रभावी भूमिका हे गुण कृष्णाला अपवादात्मक भूमिका बनवतात.”

कृष्णा बिहारी वाजपेयीच्या भूमिकेबाबत आशुतोष कुलकर्णी म्हणाले, ”मालिकेमध्ये यंग अटलच्या वडिलांची भूमिका साकारण्याची संधी माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे. १९३० मध्ये एकनिष्ठ शिक्षक व देशप्रेमी कृष्ण बिहारी वाजपेयी यांनी चार मुलगे व तीन मुली असलेल्या ब्राम्हण कुटुंबाचे पालनपोषण केले. एकनिष्ठ देशप्रेमी असलेले कृष्णा बिहारी यांचा भारतात ब्रिटीश राजवट कायम राहण्यावर विश्वास आहे, ते वसाहतवाद राज्यांप्रती सहयोग व आदर व्यक्त करतात. त्यांच्या कुटुंबाप्रती त्यांच्या महत्त्वाकांक्षा शिक्षणामध्ये सखोलपणे सामावलेल्या आहेत. इंग्रजीवर प्रभुत्व, शिक्षणामध्ये उत्तम कामगिरी करणारे ते सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतात.”

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

Sudipto Sen Breaks Silence on Threats and Exit from The Kerala Story 2, Reveals Bold Vision Behind ‘Charak: Fear of Faith’
‘ज्युरासिक वर्ल्ड : रिबर्थ’ चित्रपट लवकरचं येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ट्रेलर प्रदर्शित | BulletsIn
कंगना रनौत चाळीशीत: आहाराची रहस्ये, आयुर्वेदिक दिनचर्या, डाळ-भाजीत लिंबू का?
चित्रपट क्षेत्रात यशासाठी जोखीम नाही, आत्मविश्वास आवश्यक : राम गोपाल वर्मा
मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article थायलँडमध्ये भारतीय बुध्दविहार, आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र उभारावे!
Next Article सर्वांगीण ग्रामविकास उपक्रमामुळे आदिवासींच्या उत्पन्नात वाढ
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?