मुंबई, 12 डिसेंबर (हिं.स.)
‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेचा १७ डिसेंबरच्या महाएपिसोडमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे अप्पीचे डोहाळे जेवण. या डोहाळे जेवणानिमित्त घरातली सगळी मंडळी खूप आनंदात आहेत. पण स्वप्निल रूपालीसोबत घरीच थांबायचे ठरवतो. इकडे सरकारला सुजय किंवा मनी त्यांचं सिक्रेट अर्जुनला सांगतील ह्याची भीती असल्याने सरकार अप्पीला त्यांचं सिक्रेट सांगतो. सरकारांचे हे गुपित ऐकून अप्पीला धक्का बसणार आहे. पण डोहाळे जेवण असल्यामुळे ती इतरांसमोर आनंदी राहण्याचा प्रयत्न करतेय.
दुसरीकडे मनी जाणूनबुजून रूपालीला अप्पीचं डोहाळे जेवण होतंय आणि घरातल्या लोकांना तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही असे बोलून भडकावते. आधीच दुःखातून जात असलेली रुपाली मानसिक अपघातावरून या बोलण्याने अजूनच त्रासते. रुपाली अप्पीच्या डोहाळे जेवणात काही विघ्न आणणार का ? हे पाहण्यासाठी पाहायला विसरू नका ‘अप्पी आमची कलेक्टर’ चा महाएपिसोड १७ डिसेंबर संध्या. ७वा. फक्त आपल्या झी मराठीवर.
हिंदुस्थान समाचार
