मुंबई, 24 नोव्हेंबर (हिं.स.) झी मराठीचा ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ हा कार्यक्रम आपल्या अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे की कोण असणार ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्सच्या’ ह्या पर्वाचा विजेता. एका पेक्षा एक धुरंदर छोटे स्पर्धक असल्यामुळे महाअंतिम सामना खूप रोमांचक असणार हे नक्की. मुंबईची श्रावणी वागळे, गोव्याचा हृषीकेश ढवळीकर, जयेश खरे, छोटा पॅकेट मोठा धमाका देवांश भाटे, गीत बागडे आणि कोपरगावची गौरी अलका पगारे ह्या ६ स्पर्धकांमध्ये हा महाअंतिम सोहळा रंगणार आहे.
ह्या पर्वाच वैशिष्ट्य म्हणजे गुरुकुल, संपूर्ण पर्व हे स्पर्धक ह्या गुरुकुलात रियाज करत होते, आणि त्यांना मार्गदर्शन करत होते ‘सलील कुलकर्णी’ आणि ‘वैशाली माढे’. काय असेल निकाल ह्या महाअंतिम सोहळ्याचा ? कोणाला मिळणार ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्सची ट्रॉफी यासाठी पाहायला विसरू नका ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ महाअंतिम सोहळा २५ नोव्हेंबरला रात्री ८:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.
हिंदुस्थान समाचार
