गोंदिया : आगामी काळात लोकसभा निवडणुक असल्याने गोंदिया जिल्हयातील कायदा, सुव्यवस्था, शांतता अबाधित राखण्यासाठी सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर तसेच अवैधरित्या शस्त्रे, बाळगणारे गुन्हेगारावर आळा घालण्याकरीता पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. या अनुषंगाने जिल्ह्यांतील अवैध कृत्य करणाऱ्या तसेच अवैध शस्त्रे बाळगणारे गुन्हेगारांची माहिती काढून शोध घेवून कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. अश्यातच रावनवाडी पोलिसांनी बालाघाटकडुन गोंदियाकडे येत असलेल्या दुचाकीची झळती घेतली असता त्यांचेकडे पिस्तुलसारखा दिसणारा गावठी कट्टा आढळुन आला. यावरुन पोलिसांनी तीन इसमांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. यात आरोपी विशाल लिल्हारे (२३) याच्यासह अन्य दोन विधिसंघर्ष ग्रस्त बालकांचा समावेश आहे.
