भंडारा ०४ फेब्रुवारी : निसर्गाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या पिवळ्या चिमण्यांची (चेस्टनट शोल्डर प्रोटोनिया) शिकार करून विक्रीच्या बेतात असणाऱ्या पाच शिकाऱ्यांना पवनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. आरोपींकडून 284 चिमण्या जप्त केल्या असून त्या सर्व चिमण्या दुर्दैवाने मृतावस्थेत होत्या. आता या प्रकरणी गोपीचंद काशीराम शेंडे,भाऊराव गणपत मेश्राम,विलास तरांचंद भुरे , सुनील लवाजी शेंडे,नितीन अभिमन केवट या पाच जणांवर वन्यजीव अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
