नाशिक, १२ नोव्हेंबर (हिं.स.) : सुझुकी अॅक्सिस स्कूटरच्या डिक्कीत ठेवलेली साडेसात लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना नाशिकरोड येथे घडली. फिर्यादी भगत प्रभुदास प्रेमजी यांनी सौभाग्यनगर येथील बी. जी. पब्लिक स्कूलजवळ सुझुकी अॅक्सिस स्कूटर उभी केलेली होती. या स्कूटरच्या डिक्कीचे लॉक तोडून अज्ञात चोरट्याने साडेसात लाखांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार
