सोलापूर, 06 फेब्रुवारी (हिं.स.)। अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. विवाहाचे आमिष दाखवत तिचे फोटो काढले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. त्यानंतर जबरदस्तीने धर्मांतर करून निकाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात उघडकीस आला. या प्रकरणात वकिलासह पाच जणांविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पीडितेच्या फिर्यादीवरून इसराईल शेख, त्याचा मित्र उजेब उर्फ म. हनीफ सादिक शेख, धर्मांतराचा सल्ला देणारा वकील अब्दुल्लाह सलीम खतीब, तसेच फिरोज व त्याची आई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीतर्फे ॲड. प्रशांत नवगिरे, तर सरकारतर्फे ॲड. दत्तूसिंग पवार काम पाहत आहेत.
पीडितेचे वडील रिक्षा चालक आहेत. पीडिता दहावीत शिकत असताना, 2023 मध्ये इसराईल शेख हा तिचा पाठलाग करणे, शाळेपर्यंत मागे जाणे असे प्रकार करू लागला. डिसेंबर 2024 मध्ये मित्र उजेबच्या घरी नेऊन इसराईलने पीडितेवर अत्याचार केला. संशय आल्याने वडिलांनी चौकशी केली असता पीडितेने संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबाने घर बदलले. नंतर पीडितेने जेईई परीक्षेत चांगले गुण मिळवून अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. परंतु पुन्हा वर्गातील एका विद्यार्थ्यांच्या मोबाईलवरून दोघांचे संभाषण सुरू झाले.
—————
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड
