भंडारा ०३ जानेवारी (हिं. स.) :- डांबर खरेदीमधील अंकेक्षण अहवालात असलेल्या त्रुट्यांमुळे होणारी संभाव्य वसुली टाळण्यासाठी ग्रामसेवकाकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारणे साकोली पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले. संबंधित ग्रामसेवकाचे लाचलुचपत विभागाकडे आपल्याच साहेबांच्या डिमांडची तक्रार करून लाच स्वीकारताना रंगेहाथ सापळ्यात अडकविले. खिलेन्द्र टेंभरे (५२) असे या विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे.
हिंदुस्थान समाचार
