नाशिक, २५ नोव्हेंबर (हिं.स.) : मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने दत्तमूर्तीवरील चांदीचा मुकुट, छत्री, पताका व चांदीची तबकडी असा ४० हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना पंचवटीत घडली.
फिर्यादी संजय दिनकर देशपांडे (रा. कावेरी सोसायटी, कोकणीपाडा, मु. पो. ता. जि. ठाणे) हे मंदिराचे काम पाहतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजासमोर दत्तमंदिर आहे. या मंदिराच्या दोन्ही मुख्य दरवाजांची कुलपे अज्ञात चोरट्याने तोडून मंदिरात प्रवेश केला. यावेळी दत्तमूर्तीवरील चारशे ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट, दीडशे ग्रॅम वजनाची छत्री, ४५० ग्रॅम वजनाचे चिन्ह व पताका व २०० ग्रॅम वजनाचा चांदीचा तांब्या असा एकूण ४० हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गावित करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार
