भंडारा 03 फेब्रुवारी : भंडारा जिल्ह्याील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या आसलपाणी मोठागाव येथे शासकीय जागेवरील सागवानाची अवैध कत्तल करण्यात आली. तसेच ते विक्रीसाठी नेत असताना गोबरवाही पोलिसांनी शिताफीने वाहनांसह आरोपींना अटक केली. सदानंद रामचंद वाहणे (५०) रा. मोठागाव ता. तुमसर असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. गोबरवाही पोलिसांनी कारवाई करीत एक लाख रुपयांचे सागवनाचे लाकूड व ट्रॅक्टर जप्त केले.
