नाशिक, 27 ऑक्टोबर (हिं.स.) मागील भांडणाची कुरापत काढून युवकाला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी शंतनू संजय मौले (वय २८, रा. सातपूर गाव, नाशिक) हा तरुण सातपूर गावातील मारुती मंदिराजवळ होता. त्यावेळी आरोपी सचिन किरण मराठे (वय ३७, रा. खोडे पार्क, सातपूर, नाशिक), किरण ज्ञानेश्वर काठे (वय २९, रा. काठे अपार्टमेंट, शनी मंदिराजवळ, सातपूर) व राहुल दौलत काठे (वय २२, रा. मौनगिरी निवास, काठे मळा, सातपूर) हे तिघे तेथे आले. त्यांनी फिर्यादी मौले याच्याशी मागील भांडणाची कुरापत काढून वाद घातला, तसेच शिवीगाळ, मारहाण व दमदाटी करून खुर्ची मारून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने दुखापत केली व लाथाबुक्क्यांनी ठार मारली. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिन्ही युवकांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कातकाडे करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार
