पुणे, 30 नोव्हेंबर, (हिं.स) – अंमली पदार्थ तस्करीच्या रॅकेट प्रकरणात अटक केलेल्या भूषण पाटील, हरीश पंत, अरविंदकुमार लोहारे आणि इब्राहिम शेख यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. पंत, लोहारे आणि शेख यांच्या बँक खात्यांची माहिती पोलिसांना मिळाली आहेत. या खात्यांसह त्यांच्या संपत्तीचा तपास पोलिस करत आहेत.पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने चारही आरोपींना विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.
हरीश पंत, अरविंदकुमार लोहारे, इब्राहिम शेख यांनी इतर आरोपींना केलेल्या फोनची माहिती मिळाली आहे. अटक आरोपी तपासाला सहकार्य करत नाहीत. इब्राहिम शेख हा नागपूर येथील अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात फरार होता.
हिंदुस्थान समाचार
