नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी :- देशातील आठ प्रमुख उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात (आयसीआय) डिसेंबर 2022 च्या तुलनेत, डिसेंबर 2023 महिन्यात, 3.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोळसा, नैसर्गिक वायू, पोलाद, खते, तेलशुद्धीकरण उत्पादने, सिमेंट आणि वीज क्षेत्राने या काळात सकारात्मक वाढ नोंदवली आहे.
आयसीआय हा सिमेंट, कोळसा, कच्चे तेल, वीज, खते, नैसर्गिक वायू, तेलशुद्धीकरण उत्पादने आणि पोलाद अशा आठ प्रमुख उद्योगांच्या उत्पादनाची एकत्रित आणि वैयक्तिक कामगिरीचा आलेख मोजणारा निर्देशांक आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकात समाविष्ट केलेल्या सर्व क्षेत्रांमध्ये, या आठ प्रमुख उद्योगांचा वाटा 40.27 टक्के इतका आहे.
सप्टेंबर 2023 साठीच्या आठ प्रमुख उद्योगांच्या (तात्पुरत्या) निर्देशांकातील अंतिम वृद्धी दर सुधारित 9.4 आहे. एप्रिल ते डिसेंबर 2023-24 दरम्यान आयसीआयचा एकत्रित विकास दर मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 8.1टक्के (तात्पुरता) इतका आहे.
आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकाचा सारांश रूपात
सिमेंट – सिमेंट उत्पादन (भार : 5.37 टक्के) डिसेंबर, 2022 च्या तुलनेत डिसेंबर, 2023 मध्ये 1.3 टक्क्यांनी वाढले. याच्या एकत्रित निर्देशांकात एप्रिल ते डिसेंबर, 2023-24 या कालावधीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 9.2 टक्क्यांनी वाढ झाली.
कोळसा – कोळसा उत्पादन (भार : 10.33 टक्के) डिसेंबर 2022 च्या तुलनेत डिसेंबर 2023 मध्ये 10.6 टक्क्यांनी वाढले. याच्या एकत्रित निर्देशांकात एप्रिल ते डिसेंबर, 2023-24 या कालावधीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 12.5 टक्क्यांनी वाढ झाली .
कच्चे तेल – कच्च्या तेलाचे उत्पादन (भार : 8.98 टक्के) डिसेंबर, 2022 च्या तुलनेत डिसेंबर, 2023 मध्ये 1.0 टक्क्यांनी घसरले. याच्या एकत्रित निर्देशांकात एप्रिल ते डिसेंबर, 2023-24 या कालावधीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 0.3 टक्क्यांनी घट झाली.
वीज – वीज निर्मिती (भार : 19.85 टक्के) डिसेंबर, 2022 च्या तुलनेत डिसेंबर, 2023 मध्ये 0.6 टक्क्यांनी वाढली. याच्या एकत्रित निर्देशांकात एप्रिल ते डिसेंबर, 2023-24 या कालावधीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 6.9 टक्क्यांनी वाढ झाली.
खते – खत उत्पादन (भार : 2.63 टक्के) डिसेंबर, 2022 च्या तुलनेत डिसेंबर, 2023 मध्ये 5.8 टक्क्यांनी वाढले. याच्या एकत्रित निर्देशांकात एप्रिल ते डिसेंबर, 2023-24 या कालावधीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 6.2 टक्क्यांनी वाढ झाली.
नैसर्गिक वायू – नैसर्गिक वायूचे उत्पादन (भार : 6.88 टक्के) डिसेंबर, 2022 च्या तुलनेत डिसेंबर, 2023 मध्ये 6.6 टक्क्यांनी वाढले. याच्या एकत्रित निर्देशांकात एप्रिल ते डिसेंबर, 2023-24 या कालावधीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 5.6 टक्क्यांनी वाढ झाली .
पेट्रोलियम रिफायनरी उत्पादने – पेट्रोलियम रिफायनरी उत्पादन (भार : 28.04 टक्के) डिसेंबर, 2022 च्या तुलनेत डिसेंबर, 2023 मध्ये 2.6 टक्क्यांनी वाढले. याच्या एकत्रित निर्देशांकात एप्रिल ते डिसेंबर, 2023-24 या कालावधीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 4.7 टक्क्यांनी वाढ झाली .
पोलाद – पोलाद उत्पादन (भार : 17.92 टक्के) डिसेंबर 2022 च्या तुलनेत डिसेंबर, 2023 मध्ये 5.9 टक्क्यांनी वाढले.याच्या एकत्रित निर्देशांकात एप्रिल ते डिसेंबर, 2023-24 या कालावधीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 13.3 टक्क्यांनी वाढ झाली.
