मुंबई, 27 जुलै (हिं.स.)। विवो कंपनीचा नवीन टी4आर 5G स्मार्टफोन 31 जुलै रोजी दुपारी १२ वाजता भारतात लॉन्च होणार आहे. टी -सिरीजमधील हा नवीन 5G फोन प्रीमियम डिझाइन, चांगले हार्डवेअर आणि उत्तम कॅमेऱ्यासह सादर होणार असून, मध्यम किंमत विभागात आकर्षक पर्याय ठरणार आहे.
विवो टी4आर 5G मध्ये क्वॉड-कर्व्ह्ड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो चारही बाजूंनी वाकलेला असून फोनला प्रीमियम लुक देतो. फोन पांढरा आणि जांभळ्या ग्रेडियंट रंगात उपलब्ध होणार आहे. मागचा पॅनल मॅट फिनिश तर फ्रेम ग्लॉसी आहे. डिझाइन आणि कॅमेरा लेआउट पाहता, हा फोन आय-कू जेड10आर सारखा वाटतो, जे विवो चीच उपकंपनी आहे.
या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 प्रोसेसर दिला जाणार आहे. हा चिपसेट चांगल्या परफॉर्मन्स आणि बॅटरी एफिशियन्सीसाठी ओळखला जातो.
RAM आणि स्टोरेजबाबत कंपनीने माहिती दिलेली नसली तरी, 12GB RAM आणि 256GB स्टोरेज पर्याय असण्याची शक्यता आहे. स्मार्टफोन एंड्रॉइड15 आधारित फनटच ओएस15 वर चालणार आहे.
या फोनमध्ये 50MP सोनी IMX882 प्राथमिक कॅमेरा सेन्सर असून तो 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग ला सपोर्ट करतो. कमकुवत प्रकाशातही चांगली फोटोग्राफी करता यावी यासाठी ऑरा लाइट रिंग फ्लॅश देण्यात आला आहे, जो पोर्ट्रेट फोटोसाठी उपयुक्त ठरतो.
जर हा फोन आय-कू जेड10आर चाच री-ब्रॅण्ड असेल, तर यामध्ये IP68/IP69 डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स फीचर असू शकते. अद्याप किंमत जाहीर झालेली नसली तरी, सुरुवातीची किंमत ₹19,499 च्या आसपास असण्याची शक्यता आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
