पुणे, 27 जुलै (हिं.स.)। मेफेड्रोन विक्री करणाऱ्या तरुणास अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून चार लाख ६३ हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन, दुचाकी व मोबाईल असा सहा लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.हर्षवर्धन राहुल धुमाळ (वय २०, रा. पठारे वस्ती, खराडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळूबाईनगर परिसरात दुचाकीवर एक तरुण थांबला असून त्याच्याकडे मेफेड्रोन असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार, पोलिसांनी तरुणाची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे मेफेड्रोन, प्लास्टिक पिशव्या सापडल्या. पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, राहुल कोळपे, संदीप शिर्के, दयानंद तेलंगे, नागनाथ राख, सचिन माळवे, प्रवीण उत्तेकर, विशाल दळवी, संदेश काकडे, दत्ताराम जाधव यांच्या ही कारवाई पथकाने केली.
—————
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु
