cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > महिंद्रा ट्रॅक्टर्स अर्जुन सिरीजच्या २५ वर्षांच्या यशस्वी प्रवासानिमित्त खास घोषणा
Business

महिंद्रा ट्रॅक्टर्स अर्जुन सिरीजच्या २५ वर्षांच्या यशस्वी प्रवासानिमित्त खास घोषणा

CliQ INDIA
Last updated: September 11, 2025 6:32 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE
Mahindra Tractor Arjun

मुंबई, 10 सप्टेंबर (हिं.स.)। महिंद्राच्या फार्म इक्विपमेंट बिझनेसचा (कृषी साहित्य व्यवसाय) भाग असलेली महिंद्रा ट्रॅक्टर्स संख्यात्मक दृष्टीने जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक आहे. कंपनी आपली वैशिष्ट्यपूर्ण ट्रॅक्टर मालिका ‘महिंद्रा अर्जुन सिरीज’ ची 25 वर्षे अभिमानाने साजरी करत आहे. भारतातील सर्वात विश्वासार्ह ट्रॅक्टर ब्रँड्सपैकी एक असलेली महिंद्रा अर्जुन सिरीज ही मजबूत, बहुपयोगी आणि उच्च हॉर्सपॉवर असलेली सिरीज असून शेती आणि बिगर शेती कामांमध्ये जास्तीत जास्त ऑपरेटर कम्फर्ट व उत्तम ग्राहक मूल्य देण्यासाठी ओळखली जाते.या महत्त्वपूर्ण टप्प्यानिमित्त, महिंद्रा ट्रॅक्टर्स अभिमानाने संपूर्ण अर्जुन सिरीजसाठी स्टँडर्ड 6 वर्षांची वॉरंटी देत आहेत.

2000 मध्ये तीन हॉर्सपॉवर प्रकारांसह सादर झालेली महिंद्रा ट्रॅक्टर्स अर्जुन सिरीज सतत अपग्रेड होत आली आहे. त्यायोगे शेती आणि हॉलज ऑपरेशन्सच्या म्हणजेच जड माल, पिके किंवा साहित्य लांब अंतरावर किंवा मोठ्या प्रमाणात वाहून नेण्याचे काम यांसारख्या मागण्या पूर्ण करता येतात. त्यामध्ये TREM III व TREM IV सारख्या बदलत्या उत्सर्जन मानकांचे पालन केले जाते. आज ही सिरीज 2WD आणि 4WD अशा दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध असून पॉवर रेटिंग्स 60 हॉर्सपॉवर पर्यंत आहेत. महिंद्राच्या अॅडव्हान्स्ड mDI आणि CRDe 4-cylinder इंजिन टेक्नॉलॉजीजद्वारे चालवली जाणारी महिंद्रा ट्रॅक्टर्सची अर्जुन सिरीज सर्वोत्तम पॉवर आणि इंधन कार्यक्षमता सादर करते. ही ट्रॅक्टर मालिका म्हणजे शेतकऱ्यांची पहिली पसंती आणि हेवी-ड्युटी हॉलज ऑपरेशन्ससाठी एक विश्वासार्ह भागीदार आहे.

गिअर शिफ्ट करणे सोपे व्हावे, उच्च मॅक्स टॉर्क आणि उत्कृष्ट बॅकअप टॉर्क यासाठी ड्युअल क्लच टेक्नॉलॉजीसह असलेला कॉन्स्टंट मेष ट्रान्समिशन हा गिअरबॉक्सचा एक प्रकार अचानक वाढलेले ओझे सांभाळणे किंवा कमी वेगात काम करणे यासाठी महिंद्रा अर्जुन सिरीजला सक्षम बनवतो. क्लास-लीडिंग PTO पॉवर आणि ॲडव्हान्स्ड हायड्रॉलिक्स सिस्टीम्समुळे प्रत्येक प्रकारच्या अंमलबजावणीसाठी अप्रतिम कामगिरी सुनिश्चित होते. त्यामुळे शेतकरी जास्तीत जास्त उत्पादकता साध्य करू शकतात. जमीन तयार करणे, पिकांसाठी पडलिंग, डीप टिलेज, ऊस वाहतूक आणि कापणी सारख्या महत्त्वपूर्ण शेती कामांसाठी ही सिरीज अतुलनीय ठरते.

या महत्वपूर्ण टप्प्याबद्दल बोलताना महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या फार्म इक्विपमेंट बिझनेसचे अध्यक्ष विजय नाकरा म्हणाले, “आम्हाला महिंद्रा ट्रॅक्टर्स अर्जुन सिरीजचा प्रचंड अभिमान आहे हे असे नाव आहे ज्यांनी भारतभरातील 2.5 लाखाहून अधिक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. महिंद्राची ख्याती असलेल्या मजबूतपणातून तयार झालेली ही महिंद्रा अर्जुन सिरीज 25 वर्षांपासून शेती आणि हॉलज दोन्हीमध्ये विश्वासार्ह भागीदार ठरली आहे. पंजाबच्या गव्हाच्या शेतांपासून, महाराष्ट्राच्या कापूस पट्ट्यांपर्यंत किंवा तामिळनाडूच्या भातखाचरांपर्यंत महिंद्रा अर्जुन सिरीज भारताच्या विविध शेती क्षेत्रांमध्ये समृद्धीला बळकटी देत आहे.”

महिंद्रा ट्रॅक्टर्स अर्जुन सिरीजमध्ये 5 मॉडेल्स आहेत. यांत्रिकीकरणामध्ये गुंतवणूक करणारे शेतकरी असोत, मोठे जमीनमालक असोत किंवा हॉलज ऑपरेटर्स; यापैकी प्रत्येक मॉडेल वेगवेगळ्या शेती गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. महिंद्रा ट्रॅक्टर्स अर्जुन सिरीजची विक्री संपूर्ण देशभरातील महिंद्राच्या विस्तृत डीलर नेटवर्कद्वारे केली जाते. यामध्ये फार्म इम्प्लिमेंट्सची संपूर्ण रेंज उपलब्ध आहे. जोडीला या ट्रॅक्टर सिरीजसाठी महिंद्रा फायनान्समार्फत सोयीस्कर आणि आकर्षक वित्तीय योजनाही उपलब्ध आहेत.

—————

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule

You Might Also Like

भारतीय रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर: पश्चिम आशिया संघर्ष आणि तेलाच्या किमतींचा दबाव
एथर एनर्जी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी सज्ज, 450X लवकरच लाँच होणार
फेडरल बँकेतर्फे ‘फॉर्च्युना वेव्ह’चे अनावरण
जिओहॉटस्टार प्लॅटफॉर्मवर “तडका” नावाचा नवा सेक्शन लॉन्च
सीताराम जिंदाल यांचा पद्मभूषण पुरस्काराने सन्मान

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article माजी उपसरपंचाने गोळी झाडून संपविले जीवन; नर्तकीविरुद्ध गुन्हा दाखल
Next Article पुणे – प्रशासनाकडून पुनर्वसन गावांच्या सुविधांची पाहणी
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?