cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > गोदरेज कॅपिटल निर्माणने वाढवल्या सेवा
Business

गोदरेज कॅपिटल निर्माणने वाढवल्या सेवा

CliQ INDIA
Last updated: December 3, 2023 12:30 pm
CliQ INDIA
Share
5 Min Read
SHARE

मुंबई, 3 डिसेंबर (हिं.स.) : भारतीय व्यवसायात १२५ वर्षांहून अधिक वर्षांचा समृद्ध इतिहास असलेला गोदरेज समूह एमएसएमईंना भेडसावणाऱ्या आव्हानांवर उत्तर शोधण्यास सज्ज आहे. कंपनीमध्ये ‘राष्ट्र-निर्माण’ची नीती रुजलेली आहे. गोदरेज ब्रँड भारतीय ग्राहकांच्या विश्वासाने मजबूत आहे. गोदरेज कॅपिटल आपल्या सहयोगी नेटवर्कचा लक्षणीय विस्तार करून त्याच्या निर्माण प्लॅटफॉर्मचा मोठा विस्तार करत आहे. डीबीएस बँक इंडिया, व्हिसा, अॅमेझॉन आणि यासारख्या इतर उद्योगातील दिग्गजांसह भागीदारी करून एमएसएमईंना विकासाच्या संधी प्रदान करण्यासाठी गोदरेज कॅपिटलची वचनबद्ध आहे. ही भागीदारी एमएसएमईंना सक्षम करण्यासाठी करण्यात आलेली आहे. विविध मूल्यवर्धित सेवा आणि त्यांच्या संपूर्ण व्यवसाय प्रवासात सर्वसमावेशक मदत करण्यासाठई ही भागीदारी आहे. कंपनी एमएसएमईंच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठीच निर्माणने १३ भागीदारांचा समावेश करण्यासाठी आपले सहयोगी मॉडेल विस्तृत केले आहे.

एमएसएमईसाठी तीन महत्त्वाच्या क्षेत्रांभोवती फिरणाऱ्या विकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट:

● ग्राहक वर्गाचा विस्तार

● ऑपरेशन्स सुरळीत करणे

● कर्मचारी उत्पादकता वाढवणे

भागीदारीबद्दल बोलताना गोदरेज कॅपिटलचे एमडी आणि सीईओ डॉ, मनीष शाह म्हणाले, निर्माणच्या माध्यमातून एमएसएमईंना वाढण्यास मदत करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी देत, आमच्या भागीदार इकोसिस्टमचा विस्तार करताना आम्हाला आनंद होत आहे. एमएसएमईंना त्यांच्या व्यवसाय वाढीच्या प्रवासाचा एक भाग बनून कर्ज देण्यापलीकडे मदत करण्याचे आमचे ध्येय आहे. गोदरेज समुहाचे राष्ट्र-निर्माणचे ध्येय आहे. आमचा ठाम विश्वास आहे की, आमच्या भागीदारांद्वारे प्रदान केलेल्या सामूहिक वचनबद्धतेमुळे आणि सेवांमुळे, आम्ही भारताला ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी योगदान देऊ शकतो..”

या भागीदारीमुळे डीबीएस बँक इंडियाला चालू खात्यासह मूल्यवर्धित सेवां एमएसएमईंना देता येतील. निर्माणसोबत नोंदणीकृत व्यवसायांना अनेक लाभ मिळू शकतात. किमान सरासरी तिमाही शिल्लक नॉन-मेंटेनन्स फीवर १ वर्षाची सूट मिळे, कनेक्टेड बँकिंगसाठी टॅली ईआरपीसह अखंड एकत्रिकरण सेवा मिळेल, अत्यंत स्पर्धात्मक व्यापार आणि FX किंमत मिळेल, व्हिसाद्वारे समर्थित बिझनेस डेबिट कार्डची सुविधा मिळेल आणि एमएसएमईंसाठी सर्वांगीण आर्थिक सहाय्य प्रदान करणाऱ्या अनन्य भागीदार ऑफरही मिळेल.

भागीदारीवर टिप्पणी करताना डीबीएस बँक इंडियाच्या इन्स्टिट्यूशनल बँकिंग ग्रुपचे एमडी आणि हेड रजत वर्मा म्हणाले की, “आमच्या स्थानिक बाजाराच्या माहितीचा आणि व्यवसायातील सखोल जाणिवेचा उपयोग करून डीबीएस बँक इंडियाने गोदरेज कॅपिटल निर्माणसोबत एक नाविन्यपूर्ण सेवा तयार केली आहे. आम्ही निर्माणवर एमएसएमईसाठी फायद्यांचा एक विशेष ऑफर तयार केली आहे जो व्यवसाय वाढवण्यासाठी भागीदारांना चालू खात्याच्या प्रकारावर विशेष शुल्क-माफीद्वारे रोख प्रवाह मुक्त करण्यात मदत करेल. ही भागीदारी भारतातील एमएसएमईंना त्यांच्या वाढीच्या आकांक्षांना अनलॉक करण्यासाठी सक्षम बनवण्याची आमची वचनबद्धता अधोरेखित करते.”

व्हिसा ही कंपनी डिजिटल पेमेंटमध्ये जागतिक आघाडीवर आहे. निर्मिती प्लॅटफॉर्मद्वारे एमएसएमईसाठी सर्वसमावेशक पेमेंट सोल्यूशन्स व्हिसा देणार आहे. त्याचे विस्तृत नेटवर्क आणि जागतिक पातळीवर विस्तार यामुळे डीबीएस बँक इंडियाच्या निर्माण वापरकर्त्यांसाठी खास तयार केलेल्या सेवांनाही व्हिसाचे सहकार्य असेल.

व्हिसाचे भारतातील व्यवसाय विकास प्रमुख आणि उपाध्यक्ष सुजय रैना म्हणाले, “भारतातील लहान व्यवसायांना सर्वसमावेशक पेमेंट सेवा देण्यासाठी गोदरेज कॅपिटल निर्माण आणि डीबीएस बँक इंडिया यांच्याशी सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे. देशाच्या सामाजिक-आर्थिक आणि सर्वसमावेशक वाढीसाठी एमएसएमई महत्त्वाचे आहेत आणि व्हिसा त्यांना त्यांच्या समाधानांसह संधी आणि मूल्य अनलॉक करण्यात मदत करते. आम्ही DBS करंट अकाउंटला बिझनेस डेबिट कार्डसह सुविधा देत आहोत जे निर्माण वापरकर्त्यांसाठी खास तयार केलेले आहे, जे एमएसएमईंना अखंडपणे पेमेंटची सेवा देते, अशा प्रकारे त्यांना व्यवसाय प्राधान्ये आणि वाढीच्या अत्यावश्यकता पुढे नेण्यास सक्षम करते.”

अॅमेझॉनची निर्माणसोबतची भागीदारी एमएसएमईंना त्यांची उत्पादने Amazon.in वर देशभरातील ग्राहकांना प्रदर्शित करण्यास आणि त्यांची विक्री करण्यास मदत करेल. अॅमेझॉन ग्लोबल सेलिंग नावाच्या अॅमेझॉनच्या ई-कॉमर्स एक्सपोर्ट प्रोग्रामच्या तीन महिन्यांच्या सबस्क्रिप्शनसह जागतिक बाजारपेठांचे दरवाजेही त्यांच्यासाठी उघडतील. निर्माण वापरकर्ते मार्च 2024 पर्यंत अॅमेझॉनच्या स्मार्ट कॉमर्सकडून वेबसाइट निर्मिती आणि ओम्नी-चॅनल इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सोल्यूशन्समध्ये विनामूल्य प्रवेशही मिळवू शकतील.

भागीदारीबद्दल बोलताना अॅमेझॉन इंडिया येथे विक्रेच्या सेलर अॅक्वाझिशन विभागाचे प्रमुख गौरव भटनागर म्हणाले, “निवड, मूल्य आणि सुविधा ही आमची तीन मूलभूत स्तंभ आहेत. त्यावर लक्ष केंद्रित करून सतत विकसित होत असलेल्या ग्राहकांसाठी MSMEs सोबत भागीदारी करण्यास अॅमेझॉन कटिबद्ध आहे. गोदरेज कॅपिटल निर्माण सोबतच्या आमच्या सहकार्याद्वारे, डिजिटलायझेशन आणि ई-कॉमर्सचे फायदे एमएसएमईना मिळवून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्यांची उत्पादने देशभरातील ग्राहकांना दाखविण्यासाठी आणि विकण्यासाठी आणि निर्यात संधींचा फायदा घेण्यासाठी ते अॅमेझॉनचा फायदा घेऊ शकतील. ते ओम्नी-चॅनल इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सोल्यूशन्सद्वारे त्यांचे दैनंदिन कामकाज डिजिटायझेशन करण्यास सक्षम होतील. आम्हाला विश्वास आहे की, अशा सहकार्यांमुळे एमएसएमईंना त्यांच्या ग्राहकांना सेवा देण्यात आणि त्यांच्या व्यवसायातील वृद्धी करण्यात मदत होईल.”

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

इंदिरा आयव्हीएफचा आंतरराष्ट्रीय फर्टीलिटी बाजारपेठेत प्रवेश
गूगलने ‘इमर्जन्सी लाईव्ह व्हिडिओ’ फीचर केले लॉन्च
उद्योगिनी फाउंडेशनतर्फे रत्नागिरीत शुक्रवारपासून दीपोत्सव प्रदर्शन
अल्ट्राव्हायोलेटने महाराष्ट्रात एक्सपीरियन्स सेनटर्स केले सुरू
**सोने महागले, चांदीही वधारली: आयात निर्बंधांचा परिणाम** या आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आयात निर्बंधांमुळे पुरवठा कमी झाला असून, त्याचा परिणाम म्हणून बाजारात चांदीच्या दरातही वाढ दिसून येत आहे.

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article नवऱ्याच्या अपमानाचा बदला कसा घेणार सावी ?
Next Article राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?