मुंबई, 28 नोव्हेंबर (हिं.स.)। अल्ट्राव्हायोलेट कंपनीनं आपल्या इलेक्ट्रिक परफॉर्मन्स मोटरसायकल पोर्टफोलिओसह महाराष्ट्रात मोठी झेप घेत 48 तासांत मुंबई आणि पुण्यात सहा अत्याधुनिक एक्सपीरियन्स सेनटर्स (अनुभव केंद्रे) सुरू केले आहेत. मुंबईतील अंधेरी, वाशी आणि ठाणे तसेच पुण्यातील शिवाजीनगर, बाणेर आणि खराडी येथे सुरू झालेल्या या UV स्पेस स्टेशन्समुळे अल्ट्राव्हायोलेटचे राष्ट्रीय नेटवर्क आता देशभरातील 30 शहरांपर्यंत विस्तारलं आहे. रिटेल आणि सर्व्हिस एकाच छताखाली आणत ग्राहकांना तंत्रज्ञान, डिझाईन आणि नाविन्यपूर्णतेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा या उद्देशानं ही केंद्रे उभारण्यात आली आहेत.
या नव्या विस्तारामुळे ग्राहकांना X-47 Crossover, F77 SuperStreet आणि F77 MACH 2 या परफॉर्मन्स मोटरसायकल्सची टेस्ट राईड, विक्री, सेवा, genuine स्पेअर्स आणि अॅक्सेसरीज यांचा संपूर्ण अनुभव येथे मिळणार आहे. मुंबईतील हॉलमार्क मोबिलिटी LLP आणि पुण्यातील KHV मोबिलिटी LLP यांच्या भागीदारीत उभारलेल्या या केंद्रांद्वारे ब्रँडचा ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन अधिक बळकट झाला आहे.
अल्ट्राव्हायोलेटचे सीईओ आणि सहसंस्थापक नारायण सुब्रमण्यम यांनी सांगितले की, कंपनीचं ध्येय तंत्रज्ञानावर आधारित कामगिरीची नवीन सीमारेषा निर्माण करण्यासोबत विश्वासार्ह विक्री–पश्चात सेवा देण्याचं आहे. वाढत्या रिटेल आणि सर्व्हिस नेटवर्कमुळे रायडर्सना शोरूममध्ये प्रवेश करण्यापासून ते दीर्घकालीन मालकीअनुभवापर्यंत अखंड आणि गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध होणार असल्याचं ते म्हणाले.
कंपनीच्या मोटरसायकल्स इलेक्ट्रिक कामगिरीच्या नव्या परिभाषा ठरल्या आहेत. 40.2 hp पॉवरट्रेन, 100 Nm टॉर्क आणि 0 ते 60 kph वेग फक्त 2.8 सेकंदांत गाठण्याची क्षमता, 10.3 kWh बॅटरीनं मिळणारा 323 किमी पर्यंतचा IDC रेंज ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. 3-लेव्हल ट्रॅक्शन कंट्रोल, 10-लेव्हल रीजनरेटीव्ह ब्रेकिंग आणि UV Dynamic Stability Control मुळे सुरक्षितता आणि स्थिरता अधिक वाढते. विशेषतः X-47 मध्ये दिलेलं UV Radar Intelligence हे दोन-चाकी वाहनांसाठी खास तयार केलेलं प्रगत रडार तंत्रज्ञान असून ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, लेन चेंज असिस्ट, ओव्हरटेक अलर्ट आणि रिअर कोलिजन वॉर्निंग अशी अत्याधुनिक फीचर्स देते.
अल्ट्राव्हायोलेटने यापूर्वी सादर केलेल्या ‘Tesseract’ या जगातील सर्वात प्रगत इलेक्ट्रिक स्कूटरला आणि ‘Shockwave’ या परफॉर्मन्स मोटरसायकलला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर आता महाराष्ट्रातील सहा अनुभव केंद्रांसह कंपनीनं बाजारपेठेत आपली उपस्थिती अधिक भक्कम केली आहे. अल्ट्राव्हायोलेट च्या या जलद आणि रणनीतिक विस्तारामुळे भारतातील इलेक्ट्रिक परफॉर्मन्स सेगमेंटमध्ये स्पर्धा अधिक तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
शिवाजीनगर मधील UV स्पेस स्टेशनचा पत्ता: शोरूम नं. S3, एपिसेंटर 64-C1, ओल्ड मुंबई – पुणे हायवे, वाकडेवाडी, शिवाजीनगर, पुणे- 411005, महाराष्ट्र.
बाणेर मधील UV स्पेस स्टेशनचा पत्ता: ‘अमर टेक पार्क’ शॉप नं. S1, S3, S4, ग्राउंड फ्लोअर, सर्व्हे नं. 31/33/5/6/7/8, प्लॉट-A, बालेवाडी, पुणे- 411045, महाराष्ट्र.
खराडी मधील UV स्पेस स्टेशनचा पत्ता: शोरूम नं. 09, कुल स्केप्स (VELSTAND), S.No. 9/1/1, तुकाराम नगर, खराडी बायपास, खराडी, पुणे- 411014, महाराष्ट्र.
अंधेरी मधील UV स्पेस स्टेशनचा पत्ता: शॉप 1 & 2, क्रेसेंट सोलिटेअर बिझनेस पार्क, साकीनाका, टेलिफोन एक्सचेंज लेन जवळ, साकी नाका, मुंबई- 400072, महाराष्ट्र.
वाशी मधील UV स्पेस स्टेशनचा पत्ता: शॉप नं. 4 & 5, सेक्टर 30 A, लोकमत कॉम्प्लेक्स जवळ, वाशी, नवी मुंबई- 400705, महाराष्ट्र.
ठाणे मधील UV स्पेस स्टेशनचा पत्ता: शॉप नं. 6 & 7, ग्राउंड फ्लोअर, ब्ल्यू नाईल, प्लॉट नं. 369, एलबीएस रोड, मखमली तलाव जवळ, ठाणे (पश्चिम)- 400601, महाराष्ट्र.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
